🌟तांत्रिक कामगार युनियनची उर्जा प्रधान सचिव यांच्याकडे मागणी🌟
नागपूर :- राज्याचे मा. उर्जामंत्री व प्रधान उर्जा सचिव समवेत वीज कामगार , अधिकारी यांच्या करिता प्रलंबित असलेल्या "पगारवाढ करार 2023" ला अंतिम स्वरूप देण्यात आले. बैठकीमध्ये तारमार्ग कामगारांना ADHOC भत्ता हा रु. 500 वरून रु.1000 करण्यात आला. सदरहु वाढ तृतीय व चतुर्थ श्रेणीतील तांत्रिक कामगारांना लागु राहील असे घो षीत केले असतांना फक्त वर्ग 4 च्या तांत्रिक कामगारांनाच लाभ देण्यात आला असल्याने तृतीय श्रेणीतील तारमार्ग कामगारांना ADHOC भत्ता रु 1000 देण्यात यावा अशी मागणी राज्याचे प्रधान उर्जा सचिव यांच्याकडे केली असल्याची माहीती तांत्रिक कामगार युनियन चे केद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे.
संघटनेने महावितरण कंपनीतील चतुर्थ श्रेणीतील तांत्रिक कामगारांना तृतीय श्रेणीमध्ये वर्ग करण्यात यावे, तांत्रिक कामगारांना स्वतंत्र वेतन श्रेणी लागु करण्यात यावी, राज्याचे मा. उर्जामंत्री व आपल्या समवेत पगारवाढ बैठक पार पडली व प्रलंबित असलेल्या पगारवाढ कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले. बैठकीमध्ये तारमार्ग कामगारांना ADHOC भत्ता हा रू. 500 वरून रू. 1000 करण्यात आला. यामध्ये कोणताही दुजाभाव न करता सरसगट तारमार्ग कामगारांना (वर्ग 3 व वर्ग 4) देण्याचे ठरले. परंतु पगारवाढ करारामध्ये फक्त वर्ग 4 च्याच तांत्रिक कामगारांचा (तारमार्ग कामगार) समावेश करून वर्ग 3 च्या तारमार्ग कामगारांवर अन्याय केला आहे. या विषयांवर बैठकीमध्ये सुध्दा संघटनेने वारंवार विचारणा केली असता सदरहु ADHOC भत्ता हा सर्वांना देण्यात येणार असल्याचे कळविले. वेतन करारामध्ये वर्ग 3 च्या तारमार्ग कामगारांना ADHOC भत्ता मंजुर न केल्यामुळे तसेच इतर कारणास्तव संघटनेने वेतन करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय घेतला व नाराजी व्यक्त केली.
तरी मा.उर्जामंत्री व आपण दिलेल्या आश्वासनानुसार ADHOC भत्ता हा वर्ग 3 च्या कामगारांना सुध्दा अदा करण्यात यावा, शासन शुध्दीपत्रक क एसएसएन-1009/386/09/माशि-2 दि. 25/03/2013 नुसार कंपनीतील महीला विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक यांच्या प्रसुती रजा शासन निर्णय मान्य करण्यात यावा, शासन निर्णयाप्रमाणे विद्युत सहाय्यक / उपकेंद्र सहाय्यक व विजसेवक कंत्राटी तत्वाच्या पदावरील सेवा कालावधी उच्चवेतन श्रेणीकरीता ग्राहय धरण्यात यावे, प्रलंबित असलेली वेतन अनामली आश्वासन दिल्याप्रमाणे तात्काल निकाली काढण्यात यावी, महावितरण कंपनीच्या STAFF NORMS (GAD/CGM/(T/E)MPR/33940 Dtd 04-11-2010) प्रमाणे राज्यातील प्रत्येक झोन मधील वितरण केद्र (शाखा कार्यालय) व उपविभागीय कार्यालयाची विज ग्राहक संख्या चे सर्वेक्षण करून कार्यवाही करावी. तसेच एम. आय. डी. सी. साठी स्वतंत्र शाखा कार्यालयाची निर्मीती करण्यात यावी, तिन्ही कंपनीतील तांत्रिक कामगारांना Washing allowance (धुलाई भत्ता) मध्ये वाढ देण्यात यावी., प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, तिन्ही विज कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांना "वेतन करार 2023" प्रमाणे भत्यामध्ये 25 टक्के वाढ देण्यात आली आहे. त्यानुसार महानिर्मिती कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांना लागु असलेला फॅक्टरी अलाउन्स वेतन करारानुसार वाढीव देणे अपेक्षीत असतांना सुध्दा वाढ करण्यात आली नाही. तरी कराराप्रमाणे फॅक्टरी अलाउन्स मध्ये वाढ देण्यात यावी अशा स्वरूपाच्या तांत्रिक कामगारांच्या मागण्या / प्रश्न शासन व प्रशासनाकडे पत्राव्दारे सादर केले आहे. नागपुर व मुंबई येथे अधिवेशनादरम्यान विधानभवन समोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाची दखल घेत शासनाच्या वतीने शासन स्तरावर योग्यती कार्यवाही करून बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासित करण्यात केले होते. त्यानुसार आंदोलन स्थगित करण्यात आले असतांना अद्याप पर्यंत बैठकीचे आयोजन करण्यात आले नसल्याने तांत्रिक कामगारांमध्ये नाराजी पसरलेली असल्याने त्वरीत प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याची मागणी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर. पवार, सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे, आर. आर. ठाकुर, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी दत्तु भोईर, किरण कऱ्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोदे, विक्की कावळे, प्रदीप पाटील यांनी केली आहे.....
0 टिप्पण्या