🌟परभणी विधानसभेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी परभणी शहरातील 3 महत्वपूर्ण मागण्या मांडल्या विधानसभेत....!


🌟ज्यामध्ये समांतर पाणीपुरवठा योजना,भुयारी गटार योजना व नवीन नाट्यगृह असे प्रकल्प आदींचा समावेश आहे🌟
 

मुंबई
:- परभणी विधानसभेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी परभणी महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या शहरातील तीन महत्वपूर्ण मागण्या विधानसभेत मांडल्या असून आमदार डॉ.पाटील हे विधानसभेत २०१७ पासून या तीन महत्वपूर्ण प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे ज्यामध्ये समांतर पाणीपुरवठा योजना,भुयारी गटार योजना व नवीन नाट्यगृह असे प्रकल्प आहेत जे अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाहीत.

सदरील प्रकल्पांना मंजुरी मिळून सुद्धा अद्याप हे तीनही प्रकल्प प्रलंबित आहेत आज गुरुवार दि.१९ डिसेंबर रोजी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलत या प्रश्नाबाबत सभागृहाचे लक्ष वेधले व शासनाने निधी उपलब्ध करून हे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांनी केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या