🌟जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली माहिती🌟
नांदेड :- नांदेड येथील समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड,महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नांदेड आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या संयुक्त् विद्यमाने दिनांक ०३ डीसेंबर, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली आहे.
3 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन विविध कार्यकर्माद्वारे साजरा केला जातो. यावर्षी देखील जिल्हा परिषदेच्या सभागृहात या कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ह्या राहणार असून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार व सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी बापू दासरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.दिव्यांगांच्या या विशेष कार्यक्रमात समुपदेशन एक कौशल्य व दिव्यांगा करिता न्यायालयीन तरतुदी या परिसवांदाचे आयोजन करण्यात आले आहे.बालरोग तज्ञ डॉ. आशिष अग्रवाल व विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजितकौर जज यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात लाभणार आहे. दिव्यांगाच्या या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व प्र. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता के. टी. मोरे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या