🌟लाडक्या भावाचे मुख्यमंत्री पद जाताच लाडकी बहिण योजनेवर सक्रांत ? लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये यंदा नाहीत....!


🌟सुधीर मुनगंटीवार भाऊंची घोषणा म्हणे पुढील वर्षी भाऊबीज पासून लाडक्या बहिणींची रक्कम वाढवू🌟

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंमलात आणली अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यातील असंख्य माता-भगिनींच्या खात्यावर जवळपास ७५००/- हजार रुपयांचे मानधन जमा झाले त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला राज्यातील लाडक्या बहिणीनी विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदानरुपी आशिर्वाद देत जवळपास एकहाती सत्ता दिल्यानंतर लाडक्या बहिणीसाठी वरदान ठरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची वेळ येताच राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार मधील एक जवाबदार नेते व कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार भाऊंनी अशी घोषणा केली की लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये यंदा मिळणार नाहीत पुढील वर्षी भाऊबीज पासून लाडक्या बहिणींची रक्कम वाढवू ? सुधीर मुनगंटीवार भाऊंनी केलेल्या या घोषणेमुळे असंख्य लाडक्या बहिणींच्या अपेक्षांवर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली असून राज्यात विधानसभा निवडणूक पुर्व लागू करण्यात आलेली सदरील 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' विधानसभा निवडणुकीत मतदान मिळविण्याच्याच दृष्टीने लागू करण्यात आली होती की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशातील लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात आलेल्या अपयशानंतर महाराष्ट्रात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरु करण्यात आली होती.श या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना महिना १५०० रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, महायुतीने विधानसभा निवडणुकीत १५०० रुपयांची ही रक्कम २१०० रुपये करणार, असे आश्वासन दिले होते. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असून यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान,

नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणांना २१०० रुपये कधी पासून मिळणार याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देणार हे आश्वासन देण्यात आले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करु. हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशाभरात खराब होईल. निवडणुका झाल्या की, आम्ही आश्वासन पूर्ण करत नाहीत, अशी आमची प्रतिमा होईल मी याबाबत मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे. आपण शब्दावर ठाम राहायला हवे. मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. ती आश्वासन धुळीस मिळू देणार नाहीत. आमच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये लाडक्या बहिणांना २१०० रुपये देण्याची क्षमता आहे. महायुतीतील एकही पक्ष आमच्या २१०० रुपये देण्याच्या योजनेला विरोध करणार नाही. जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून १५०० रुपयांमध्ये वाढ करुन २१०० रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरु केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या