🌟पुणे येथील मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉलमध्ये दि.12 जानेवारी रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा🌟
परळी (दि.२९ डिसेंबर २०२४) - महाराष्ट्र फाउंडेशन पुणे च्या वतीने बालासाहेब जगतकर यांना महाराष्ट्र योद्धा समाज रत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. बाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र फाउंडेशन पुणे या संस्थेने बालासाहेब जगतकर यांच्या गेल्या पाच वर्षापासूनच्या सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्याची दखल इलेक्ट्रॉनिक मीडियावर घेऊन त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुणे चा राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाज रत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला असून तसे त्यांना निवड पत्र ही मिळाले असून महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार समाज रत्न पुरस्कार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पुणे येथील मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉल प्लॉट 216 कोरेगाव रोड रागविलास सोसायटी कारेगाव पार्क पुणे येथे सकाळी ठीक अकरा वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार असून या कार्यक्रमास बालासाहेब जगतकर यांना सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून आपला पुरस्कार स्वीकारावा असेही पत्र देण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे....
0 टिप्पण्या