🌟समता साहित्य अकादमी तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन देण्यात येतो पुरस्कार🌟
परभणी (दि.१९ डिसेंबर २०२४) :- निर्भीड,निष्पक्ष,पुरोगामी विचाराचे तसेच समाजातील तळागाळातील अन्याय ग्रस्त लोकांच्या भूमिका, सामाजिक कार्यांना प्रोत्साहन, चुकीच्या ठिकाणी रोख ठोक भूमिका घेऊन कार्य कारण्याच्या हेतूने संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या संकल्पनेतून सुरु केलेले *समाजहित न्यूज* महाराष्ट्र राज्य या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म वर चालणारे वृत्त वाहिनी, पोर्टल, डिजिटल वृत्तपत्र च्या माध्यमातून निर्भीडपणे रोखठोक भूमिका मांडून शासन - प्रशासन दरबारी रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांची भूमिका मांडून जनता व शासन प्रशासनाला जागं करन्याचे तसेच परभणी जिल्ह्यात झालेल्या संविधान विटंबना प्रकरणी सदरील प्रकरनेचे अचूक, निर्भीड पणे जीवाची पर्वा न करता संपूर्ण घटनेचे थेट प्रक्षेपण कव्हॅरेज करून, व त्या संदर्भातील बातम्या, अफवा चे खंडन करून वेळोवेळी खरी माहिती देण्याचे काम समाजहित न्यूज च्या संपूर्ण टीम ने केलेल्या कार्याची दखल घेऊन "समाजहित न्यूज महाराष्ट्र राज्य" ला समता साहित्य अकादमी यवतमाळ तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय "*उत्कृष्ट पत्रकारीता राज्यस्तरीय पुरस्कार 2024*" जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत 21 डिसेंबर 2024 रोजी मुबईत प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अशोकराव माने कोल्हापूर, हिंदी सिने अभिनेते अर्जुन यादव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा देशपांडे, डॉ. संदीप सिरसाठ, डॉ. नितीन एस. तायडे क्राईम ब्रांच मुंबई आदी असणार आहेत.
समता साहित्य अकादमी तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. यावर्षी उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार 2024 परभणी जिल्ह्यातील 'समाजहित न्यूज' ला जाहीर झाला आहे. या पुरस्कार निवडीचे पत्र समाजहित न्यूजचे संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे यांना दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी समता साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात आले आहे. तर हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण समाजहित न्यूज परिवाराचा आहे त्यामुळे हा पुरस्कार समाजहित न्यूज च्या संपूर्ण संघाच्या वतीने संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे, कार्यकारी संपादक ऍड.सुभाष अंभोरे, व्यवस्थापक प्रतिनिधी संदीप वायवळ, गंगाखेड प्रतिनिधी अब्दुल रहमान खान पठाण, परभणी शहर प्रतिनिधी विकास टोंगराज, वार्ताहर शेख कलीम, वार्ताहर युनुस कच्ची बोगानी, ग्रामीण प्रतिनिधी राहुल मगरे, पूर्णा तालुका प्रतिनिधी नामदेव चापके, सेलू तालुका प्रतिनिधी डॉ. शिवाजी शिंदे, मुंबई नांदेड प्रतिनिधी नूरुद्दीन जावेद सिद्दिकी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर आदींच्या वतीने स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती समाजहित न्यूज चे संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी माध्यमाना दिली आहे. तसेच लोक स्वतंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, महाराष्ट्र संघटन प्रमुख भगीरथ बद्दर, परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, ज्येष्ठ पत्रकार मदनबापू कोल्हे, ज्येष्ठ पत्रकार देवानंद वाकळे, पत्रकार शिवशंकर सोनुने, पत्रकार राजकुमार हट्टेकर, पत्रकार सुधाकर श्रीखंडे, प्राध्यापक राजकुमार मनवर , पत्रकार विजयकुमार कुलदीपके, पत्रकार संघपाल अढागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे हे काम करत आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे 21 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होणार आहे. "समाजहित न्यूज" ला "उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर झाल्याबद्दल प्रमोद अंभोरे व त्यांच्या संपूर्ण टीम वर लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे......
0 टिप्पण्या