🌟प्रधानमंत्री जनधन योजनेची 11.30 कोटी जनधन खाती निष्क्रिय :14,750 कोटी रुपये जमा शिल्लक.....!


🌟केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिली माहिती🌟 

✍️ मोहन चौकेकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांशी 'प्रधानमंत्री जन धन' योजनेत आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी आपले खाते उघडले आहे. पण, आता या जन धन खात्यांबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत उघडण्यात आलेल्या एकूण खात्यांपैकी 11.30 कोटी खाती निष्क्रिय झाली आहेत. म्हणजे त्यांच्यात दीर्घकाळापासून कोणताही व्यवहार झालेला नाही. 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 54. 03 कोटी खाती उघडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.  20 नोव्हेंबर 2024 पर्यंत निष्क्रिय बँक खात्यांमध्ये 14,750 कोटी रुपये शिल्लक आहेत.

💫निष्क्रिय खात्यांची टक्केवारी कमी झाली :-

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये (PSBs) निष्क्रिय प्रधान मंत्री जन धन खात्यांची टक्केवारी मार्च 2017 मध्ये 39.62 टक्क्यांवरून नोव्हेंबर 2024 मध्ये 20.91 टक्क्यांवर घसरली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोन वर्षांहून अधिक काळ खात्यात व्यवहार नसल्यास, बचत आणि चालू खाती निष्क्रिय मानली जाात. सक्रिय खात्यांच्या टक्केवारीवर लक्ष ठेवण्यासाठी बँका सातत्याने ठोस प्रयत्न करत आहेत आणि सरकारकडून प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेवले जात असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

💫आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला :-

ही माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, निष्क्रिय खात्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि अशी खाती सक्रिय करण्याची प्रक्रिया सुलभ आणि त्रासमुक्त करण्यासाठी बँकांना तातडीने आवश्यक पावले उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. यामध्ये मोबाइल/इंटरनेट बँकिंग, नॉन-होम ब्रँच, व्हिडिओ प्रक्रिया इत्यादीद्वारे केवायसीचे अपडेट सक्षम करणे समाविष्ट आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या