🌟अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा उद्या 03 डिसेंबर रोजी 85 वा वर्धापन दिन....!


🌟राज्यातील 10,000 पत्रकारांची उद्या आरोग्य तपासणी : एकाच दिवशी एवढ्या पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा विश्व विक्रम🌟


मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या 3 डिसेंबर रोजी राज्यातील बहुतेक जिल्ह्यात 10,000 पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी आज येथे एका पत्रकाव्दारे दिली आहे उद्या 3 डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिवस राज्यभर "पत्रकार आरोग्य तपासणी दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो.. या दिवशी राज्यभर पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येते.. या तपासणीत काही पत्रकारांना पुढील उपचाराची गरज पडल्यास संबंधित पत्रकारावर मुंबईत उपचार करण्याची व्यवस्था केली जाते.. गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरू आहे.. गेल्या वर्षी 8,500 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती.. यावर्षी हा आकडा 10,000 वर जाईल अशी अपेक्षा एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.


स्थानिक पातळीवर डॉक्टरांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी केला जातो.. एस.एम.देशमुख वडवणी, बीड येथील कार्यक्रमात सहभागी होतील, विश्वस्त शरद पाबळे पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर रोहा येथे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर सांगलीत, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे परभणीत , कोषाध्यक्ष मन्सूरभाई तसेच राज्य पर्सिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी नगर येथील शिबिरात सहभागी होणार आहेत..डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे वडवणी येथील उपक्रमात भाग घेतील पत्रकार अहोरात्र लोककल्याणासाठी राबत असतो, त्यामुळे त्याचे कायम प्रकृतीकडे दुर्लक्ष होते.. अशा पत्रकारांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी असा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आहे.. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात आणि 354 तालुक्यात ही शिबिरं होणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली.

मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी मुंबईत झाली.. राज्यातील पत्रकारांची पहिली आणि देशातील पत्रकारांची दुसरी मोठी संघटना म्हणून परिषद औळखली जाते.. देशभरात मराठी पत्रकार परिषदेचे 12,000 सदस्य असून राज्यातील 36 जिल्ह्यात आणि 354 तालुक्यात परिषदेचा शाखा विस्तार झालेला आहे.. पत्रकारांच्या हिताचे उपक्रम आणि हक्काचे लढे परिषदेच्यावतीने सातत्यानं राबविले जातात.. पत्रकार आरोग्य तपासणी हा उपक्रम देखील असाच असून पत्रकार संघांनी तो यशस्वी करावा असे आवाहन एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी, अनिल वाघमारे  यांनी केले आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर 

मराठी पत्रकार परिषद 

बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या