🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयात स्वतंत्र आदर्श आचार संहिता कक्ष स्थापन....!

 


🌟विधानसभा निवडणूक प्रचारावर आदर्श आचारसंहिता पथकाची नजर🌟

परभणी (दि.06 नोव्हेंबर 2024) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांकडून त्यांच्या प्रचारातून आदर्श आचारसंहितेचे भंग तर होत नाही ना ? यावर निवडणूक विभागाने करडी नजर ठेवण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयात स्वतंत्र आदर्श आचार संहिता कक्ष कायदा व सुव्यवस्था कक्ष स्थापन करण्यात आला असून पाथरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम हे प्रथक प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

              पाथरी विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवार निश्‍चित झाले असून निवडणूक रिंगणात असलेले सर्व उमेदवारांना त्यांचे निवडणूक  चिन्हांचे वाटप ही झालेले आहे. आता उमेदवार आपले प्रचार निर्धारित वेळेत विविध माध्यमातून  करत आहेत, उमेदवारांना आपले प्रचार करताना आदर्श आचारसंहितेचे भंग होणार नाही याची काळजी घेणे ही आवश्यक आहे. यासाठी निवडणूक विभागाने त्यांना प्रचार करण्यासाठी नियम व अटी दिलेल्या आहे. त्या नियम व अटींच्या पालन करून सर्व उमेदवारांनी आपले प्रचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

               तसेच यावर करडी नजर ठेवण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयात स्वतंत्र आदर्श आचार संहिता कक्ष कायदा व सुव्यवस्था कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याकरीता शहरी भागात स्वतंत्र तीन पथक पाथरी, मानवत व सोनपेठ येथे कार्यरत असून ग्रामीण भागात पाथरी, मानवत, सोनपेठ व परभणी ग्रामीण असे ग्रामीण  4 पथक  कार्यान्वित झाले आहेत व त्याचप्रमाणे भरारी पथक ही स्थापन केलेली आहे. हे पथक पूर्ण निवडणुकीच्या काळात 24 तास  शिफ्ट मध्ये काम करणार आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच आदर्श आचारसंहिता पथक प्राप्त तक्रारींची सत्यता पडताळून 100 मिनिटात कारवाई करून तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहेत, अशी माहिती पाथरी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या