🌟अबब....वीज ग्राहकांची संख्या तीन कोटींवर ; महावितरणवर महाग्राहकांचाच भार.....!


🌟आता ग्राहकांच्या विजेचे ऑडिट करण्यासाठी महावितरणला महासंगणकाची गरज भासेल🌟

   ✍️ मोहन चौकेकर 

महावितरणवर आता ग्राहकांचा भार इतका वाढला आहे की, त्या ग्राहकांना महाग्राहक म्हणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यानंतरची ही विक्रमी वाढ असून, वीज ग्राहकांचा आकडा तब्बल तीन कोटींवर पोहोचल्याने आता ग्राहकांच्या विजेचे ऑडिट करण्यासाठी महावितरणला महासंगणकाची गरज भासेल असे चित्र दिसत आहे.

राज्यात गेल्या चार वर्षांत सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांची संख्या 30 लाखांंनी वाढ झाली आहे. यात महावितरण व्यावसायिक, घरगुती, कृषी यासह पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा आणि इतर असा प्रचंड भार महावितरण या कंपनीवर आहे. वीज कंपनीचे काही वर्षांपूर्वी त्रिभाजन झाले असले तरी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण यांच्यावरचा भार वाढतच आहे. गेल्या चार वर्षांत ही वाढ टिपेला पोहोचली असून, वाढते उद्योगधंदे आणि वाढते रोजगार यामुळे विजेची मागणी वाढत आहे

ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतरित होणार्‍यांची संख्या वाढल्याने अनेक ग्रामीण भाग निमशहरी झाले आहेत. ते सर्व भाग महावितरणच्या अखत्यारित येतात. त्यामुळे महावितरणकडे शहरी ग्राहकांची संख्या प्रचंड असून, त्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक, कृषी, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर ग्राहकांचा सेवा देण्यासाठी वीज कर्मचारी सात दिवस चोवीस तास असे अहोरात्र काम करत असतात. त्यामुळे विजेचा पुरवठा करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागते.

प्रामुख्याने उन्हाळ्यात विजेची मागणी यंदा सर्वात विक्रमी म्हणजे 27 हजार मेगावॅट इतकी झाली होती. हादेखील एक वेगळा विक्रम आहे. महावितरणने ग्राहकांच्या पसंतीला उतरत ही विक्रमी वीज मागणी लीलया पेलली.......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या