🌟भारताने जगाला दाखवली ताकद : हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून इतिहास रचला....!


🌟अमेरिकेकडंही नाही हे तंत्रज्ञान : आता अशा क्षेपणास्त्र क्षमतेच्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे🌟

✍️ मोहन चौकेकर 

भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावर हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून इतिहास रचला आहे. आता अशा क्षेपणास्त्र क्षमतेच्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.

भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे असे तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे तंत्रज्ञात अमेरिकेकडे देखील नाही, रशिया, चीननंतर भारताने या प्रकरच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीची माहिती ट्विट करून दिली आहे. ही चाचणी शनिवारी ओडीशा येथील किनाऱ्यावर घेण्यात आली.

या क्षेपणास्त्राची चाचणी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले की, यामुळे भारताला अशा प्रकारचे महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने एक मोठा टप्पा गाठला आहे.

या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आणि या महत्वपूर्ण कामगिरीमुळे आपला भारत देश अशा महत्त्वाच्या आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची क्षमता असलेल्या निवडक देशाच्या यादीत सामील झाला आहे असे या वेळेस संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले या यशाबद्दल त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओ सशस्त्र दल आणि उद्योग जगताचे अभिनंदन केले आहे.

हायपरसॅनिक क्षेपणास्त्राची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ते १५००/ 1500 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरापर्यंत पेलोड वाहुन नेऊ शकते.या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे ताशी सुमारे ७१७४/ 6174 किमी वेगाने मारा करते अशावेळी कोणते प्रकारच्या एअर डिफेन्स यंत्रणा या क्षेपणास्त्राचा शोध घेऊन त्याला हवेत नष्ट करणे  अशक्य होते , अशक्य आहे. हे क्षेपणास्त्र आधुनिक लष्करी तंत्रज्ञान प्रतिकारशक्ती आणि मारक शक्तीने सुसज्ज करण्यात आले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या