🌟भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान चिब यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली नियुक्ती🌟
मुंबई :- भारतीय युवक कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान चिब यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्णेचे भुमिपुत्र तथा पुर्णा शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख अहेमद साहेब यांचे सुपुत्र अबु बकर सिदीक शेख यांची दि.०५ नोव्हेंबर २०२४ रोजी एका नियुक्तीपत्राद्वारे भारतीय युवक काँग्रेस पक्षाच्या मराठवाडा निरिक्षक पदावर नियुक्ती केली आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल प्रसार माध्यमांशी बोलतांना भारतीय युवक काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त मराठवाडा निरिक्षक अबु बकर सिदीक शेख म्हणाले की भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान चीबजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री नाना पटोलेजी,धोरण आणि संशोधन विभाग राष्ट्रीय प्रभारी श्री अरहान बक्शजी,आमचे मार्गदर्शक व मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभाग प्रभारी श्री नियती ओबानजी यांचा मी अत्यंत आभारी असून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि माझी निवड भारतीय युवक काँग्रेस मराठवाडा निरिक्षक पदावर केल्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी असून सोपवलेल्या महत्त्वाची जबाबदारी मी मनापासून प्रामाणिक पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहिल असेही अबु बकर सिदीक शेख यांनी म्हटले असून त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.......
0 टिप्पण्या