🌟लष्करात भरती होण्याचे स्वप्न अधूर पहाटे व्यायाम करतांना अज्ञात वाहणाची धडक २१ वर्षे तरूणाचा जागीच मृत्यू....!


🌟सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर घडली दूर्देवी घटना🌟

🌟या घडलेल्या घटनेने पानकनेरगाव परिसरामध्ये एकच शोककळा पसरली आहे🌟

✍️शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या पानकनेरगाव येथील युवक दररोज प्रमाणे सकाळी आपली आर्मी भरतीची तयारी करत असताना अज्ञात वाहनाची धडक लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.पानकनेरगाव येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास कार्तिक प्रल्हाद डोंगरे (वय वर्षे २१) हा आर्मी भरतीची तयारी करत असताना रोजच्या प्रमाणे सेनगाव रिसोड रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी गेला होता. काही वेळ त्याने आपली व्यायामाची तयारी केली. 

व्यायाम करत असताना रस्त्यावर काळोख असल्याने भरगाव वेगात येत असलेल्या अज्ञात वाहनाने कार्तिकला जोरदार धडक दिली. या धडकेत कार्तिक गंभीर जखमी झाला सोबत असलेले मित्र यांनी आरडा ओरड करूण आज्ञात वाहणांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला सदर मात्र अज्ञात वाहनाने न थांबता धूम ठोकली  सोबत असलेल्या मित्रांनी गावात संपर्क साधून तात्काळ वाहणात टाकून रिसोड  येथे रूग्णालयात हलवण्यात आले परंतु वेळ निघून गेली असल्याने डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. कार्तिक हा लहानपणी अंदाजीत दिड - दोन वर्षाचा असताना २००६ मध्ये आई- वडील व आपल्या कूटूबियासोबत शेगांव दर्शनाला जात असताना  यांच्या वाहनाचा भिषण अपघात झाला होता. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून कार्तिक या अपघातामधून वाचला होता. पण, या अपघातात त्याचे चूलत कूटूंब व आईचा जागीच  मृत्यू झाला आणि वडील गंभीर जखमी झाले होते या भिषण अपघातात आई व चूलत कूटूंब आणि इतर प्रवासी एकूण ६ जण ठार झाले होते या दुःखामधून परिवार कसाबसा सावरला.  कार्तिक दोन वर्षाचा असताना या भीषण अपघातातून वाचला होता सदर मात्र २१ व्या वर्षी काळाने अखेर घाला घातला आणि कार्तिक देश सेवा करण्याचे स्वप्न अधूरच राहिले  कार्तिक एक अत्यंत सर्वसामान्य घरातला मुलगा कष्ट व जिद्दीने मेहनत करून शिक्षण घेत होता परंतु  कार्तिक यांच्या जाण्याने  वडील व कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळाला आता मात्र आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्तिक खूप मेहनत करत होता.

💥आर्मीमध्ये जाऊन देश सेवा करायची हे स्वप्न उराशी बाळगत :-

कार्तिक जिद्दीने भक्तीची तयारी करत होता दरम्यान, त्याला देखील काळाने हिरावून घेतले आहे. या घटनेने त्याची सावत्र आई व वडील तसेच, नातलगांनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिसोड येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्तिक याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले व पानकनेरगाव गावी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आला आहे. अज्ञात वाहन चालका विरोधात अजून तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी फोनवरून माहिती दिली आहे. तरी, या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या