🌟जिंतूर पोलिस स्थानकात आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी दोन्ही आरोपीं विरोधात गुन्हा दाखल🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील 'सरकी ढेप' व्यापार्याकडून तब्बल ०९ लाख २२ हजार ९४० रुपयांची सरकी ढेप खरेदी करुन या खरेदी केलेल्या मालाचे रुपये न देता त्या व्यापार्याची फसवणूक केल्या प्रकरणी ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन आरोपीं विरोधात जिंतूर पोलिस स्थानकात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूक प्रकरणी जिंतूर येथील त्रिलोक कॉटन प्रा.लि.चे व्यवस्थापक म्हणून कार्यरत गुंजनकुमार यांनी तक्रार दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दलाल निरज धुत व योगिता ट्रेडिंग कंपनीचे मालक जेठराम नायक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनी फिर्यादीजवळून सरकी ढेप खरेदी केली या मालाचे ०९ लाख २२ हजार ९४० रुपये झाले. आरोपींनी फिर्यादीला बँक खात्यात पैसे टाकल्या जातील असे सांगितले मात्र वारंवार पैशाची मागणी करुनही रक्कम पाठविण्यात आली नाही सदर आरोपींनी या पूर्वीदेखील इतरांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे पुढे आले आहे अखेर फिर्यादीने जिंतूर पोलिस स्टेशन गाठून दोन्ही आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक पुंड करीत आहेत....
0 टिप्पण्या