🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟धमकी देतोस की काय ? मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल🌟

💫 राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, त्याला काय आधार आहे ? काहीही ठोकून देतात, जे काहीही बोलतात, त्याची नोंद का घ्यायची ? शरद पवार यांचा हल्लाबोल  

 💫 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत जाण्यासाठी घेतलेल्या बैठकीला शरद पवार आणि गौतम अदानी उपस्थित होते, अजित पवारांचा दावा; शरद पवार म्हणाले; उद्योगपतीच्या मर्जीने राजकारण चालत नाही 

 💫 आयुष्यात संविधान वाचले नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान रिकामं वाटते, रंगावरही बोलतात; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नंदुरबारमधून नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल 

💫 राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचे मोठे वक्तव्य ; नितीन गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी' ; ईव्हीएम मशिनमध्ये गडबड, मला सतत एका व्यक्तीचा फोन येतोय; निवडणुकीपूर्वी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

💫 माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; भाजप आमदार पंकजा मुंडे यांचे एका इंग्रजी  दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य ; मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही ; बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरुन पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

💫 उद्धवजी ज्यांनी तुमच्या सोबत गद्दारी केली, त्या आमदाराला धडा शिकवण्यासाठी आम्हाला बंडखोरीचा निर्णय घ्यावा लागला, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांचे स्पष्टीकरण ; सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

💫 राहुल गांधींनीच मला आणि सुजयला ( विखे ) पक्षाबाहेर काढलं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा  गौप्यस्फोट 

💫 मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं ; मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा 

💫 धमकी देतोस की काय ? मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल ;  मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही! 

💫 कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई 

💫 उदगीरमध्ये संजय बनसोडेंसमोर पवार गटाच्या सुधाकर भालेरावांचं आव्हान,कोण मारणार बाजी ? 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या