🌟परभणीत अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीने आज कार्यशाळेचे आयोजन....!


🌟शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात भारतीय संविधानाचे ७५ वर्षे या विषयावर कार्यशाळा 🌟

परभणी  :- परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आज शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी 'भारतीय संविधानाचे ७५ वर्षे' या विषयावर अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांताच्या परभणी शाखेच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

               ‘भारतीय संविधानाचे ७५ वर्षे’ या विषयावर वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ०५.०० ते ०७.०० वाजेच्या दरम्यान आयोजित केलेल्या या कार्यशाळेस अखिल भारतीय अभिवक्ता परिषदेचे क्षेत्रीय संयोजक तथा उच्च न्यायालयाच्या संभाजी नगर खंडपीठातील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.संजीव देशपांडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यशाळेत विधी क्षेत्रातील मान्यवरांसह अन्य क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या परभणी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या