🌟पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत कर्तव्यावरील कर्मचार्‍यांनो मतदान करावे....!


🌟निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांचे आवाहन : रविवार दि.१७ नोव्हेंबर पर्यंत टपाली मतदान🌟

परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी रविवार दि.१७ नोव्हेंबर पर्यंत आपले मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे.

               पाथरी विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांना टपाली मतदान करण्याची सुविधा देवनांद्रा  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रविवार दि.१७ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे या ठिकाणी पाथरी तालुक्यातील मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी व पर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांसाठी मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या कर्मचार्‍यांनी अद्याप मतदान केले नाही त्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन त्वरीत आपले मतदान करावे, असे आवाहन लाहोटी यांनी केले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या