🌟यावेळी कर्मचाऱ्यांनी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो,शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे अश्या घोषणा दिल्या🌟
परभणी/पाथरी (दि.१८ नोव्हेंबर २०२४) : मतदानाची तारीख जवळ आली म्हणून मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी पाथर्डी येथील निवडणूक विभागातील सर्व अधिकारी,तालुक्यातील अधिकारी,पोलीस,कर्मचारी यांनी आज सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता पंचायत समिती पाथरी येथून सेलू कॉर्नर मार्गे पोलीस स्थानकापर्यंत मानवी साखळीचे आयोजन करुन त्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा यासाठी निवडणूक विभागामार्फत स्वीप टीमच्या माध्यमातून गावोगावी जाऊन मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारीत वाढ होण्यासाठी जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. मतदारांची जनजागृती करून मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, पाथरी सोनपेठ व मानवत तालुक्यातील विविध कार्यालयाच्या प्रमुखांनी तसेच कर्मचार्यांनी या मानवी साखळीमध्ये सहभाग घेतला होता, तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी ताई, नगरपालिकेतील कर्मचारी, विविध शाळेतील शिक्षक , सर्व कार्यालयातील कर्मचारी यांनीही सहभाग नोंदवला. मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे या आशयाच्या घोषणा अधिकार्यांसह सर्व कर्मचार्यांनी दिल्या.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी, उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर हांदेशवार (तहसीलदार पाथरी), पांडुरंग माचेवाड (तहसीलदार मानवत), सुनील कावरखे (तहसीलदार सोनपेठ), ईश्वर पवार (गटविकास अधिकारी पाथरी), मधुकर कदम (गटविकास अधिकारी मानवत), तुकाराम कदम (मुख्याधिकारी पाथरी), श्रीमती कोमल सावरे (मुख्याधिकारी मानवत), पोलीस निरीक्षक मंडलवार, वसंत महाजन (नायब तहसीलदार निवडणूक), गंगाधर येल्हारे (नायब तहसीलदार), जीवन धारासुरकर (नायब तहसीलदार), मीडिया कक्ष प्रमुख संदीपान घुंबरे, जमील सिद्दीकी, श्रीमती लोंढे, पुजारी (तालुका आरोग्य अधिकारी पाथरी), श्रीमती मंगल गायकवाड (बालविकास अधिकारी पाथरी) यांची प्रमुख उपस्थिती होती. स्विप टीमचे गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड, शंकर धावारे, धम्मपाल उघडे, किशन डहाळे, सचिन चव्हाण यांनी या मानवी साखळी रॅलीचे संचालन केले.......
0 टिप्पण्या