🌟सिल्लोड मधील अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील गुंडागर्दी रोखण्यासाठी साथ देण्याचं मतदारांना ठाकरेंच आवाहन🌟
💫 आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य ; देवेंद्र फडणवीस काहीही म्हटले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्राचे नेते निर्णय करतील, चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य
💫 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित, महिला, शिक्षण आरोग्य, पर्यावरणसह कृषी धोरणाचा समावेश ; राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचे, शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत, उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी ठेवले बोट
💫 देवेंद्र फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजित पवारांचं वक्तव्य ; देवेंद्र फडणवीस हे गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊतांची टीका
💫 मतभेद असले तरी भाजप कार्यकर्त्यांशी बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचं सिल्लोडमध्ये मोठं वक्तव्य, अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील गुंडागर्दी रोखण्यासाठी साथ देण्याचं आवाहन ; लिहून घ्या! महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत नसतील, संजय राऊतांचं मोठे खळबळजनक वक्तव्य
💫 आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट ; 15/11/2024गद्दारीचा काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची रेघ, यवतमाळमध्ये डॉ.अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका ; सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबच्या मांडीवर बसणारी ठाकरे-पवारांची आघाडी, उमरेडमध्ये अमित शाहांची महाविकास आघाडीवर टीका
💫 उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मला नको होतं, म्हणून मी शिवसेना सोडली, नाराण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, बाळासाहेबांना 6 पानी पत्र दिल्याचाही केला उल्लेख ; आम्ही सगळे एकत्रच, 'ना बटेंगे ना कटेंगे', अजित पवारांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर ; बारामतीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका; अजित पवार म्हणाले मी त्याचं समर्थन करत नाही
💫 बोलायला उभा राहिलो की अनेकवेळा पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा ; वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता देवेंद्र फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार ; माझ्या विरोधात लेकीला उभं करून पवार साहेबांनी राजकीय जीवनातली मोठी चूक केली; धर्मरावबाबा आत्राम यांचा घणाघात
💫 सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींनी केल्या मोठ्या घोषणा ; राहुल गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना फोन, प्रकृतीची विचारपूस केली तब्येतीची काळजी घेण्याचे केले आवाहन
💫 हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात ; सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, सोलापूर जिल्ह्यात चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
💫 युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, राजकीय नेत्यांना दिली 8 आव्हानं, अटी पूर्ण करणाऱ्यांचा निवडणुकीत प्रचार करणार ; नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या