🌟अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत🌟
💫 राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध, लाडकी बहीणचे पैसे 2100 रुपये करणार, अजित पवार यांचा नवा वादा ; अजितदादांकडून जनतेला चंद्र आणून देण्याचा वादा, त्यांच्या जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टेक, अमोल कोल्हेंची टीका ; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फलटणमध्ये तिकीट, तरीही रामराजे प्रचारात नाहीत; अजित पवार करणार कारवाई
💫 वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत, कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा ; उद्धव ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात मोठ्या घोषणा
💫 अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत ; निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद्य साथ, एके काळी 'कॅसिनो ऑपरेटर' राहीलेले डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले ; अमेरिकेतील राजकीय घडामोडीनंतर क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये उत्साह, बिटकॉइनने गाठली सर्वोच्च किंमत
💫 राष्ट्रवादीच्या जन्मानंतर संत शरद पवारांनी जातीचं राजकारण केलं; लातूरच्या सभेत राज ठाकरेंची टीका ; महाराष्ट्र समृद्ध आणि प्रगत करणं शक्य, पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही, राज ठाकरेंचं मंगळवेढ्यात वक्तव्य ; आरक्षण दिलं म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फटकारले
💫 संघाने घटनेवर नाही तर थोर पुरुषांच्या विचारधारेवर हल्ला केला, नागपुरातून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल ; राहुल गांधींना देशाबद्दलचा अभ्यास नाही, अभ्यास नसणाऱ्यांना यात्रा काढावी लागते, प्रफुल्ल पटेलांचा हल्लाबोल ; काँग्रेसने आत्मविश्वास गमावलाय, हे पराभूत मानसिकतेचे लक्षण; अशोक चव्हाण यांची बोचरी टीका
💫 लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? तुमच्या अवती भवती शहरी नक्षलवादींचा घोळका, देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींवर टीकास्त्र ; गोपीचंद पडळकरांना निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
💫 मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच, मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा आवाहन ; मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
💫 महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? आमदार सदाभाऊ खोतांची जतमध्ये शरद पवार यांच्यावर टीका ; शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही, जितेंद्र आव्हाडांची सदाभाऊ खोतांवर टीका
💫 अकबरुद्दिन ओवेसींकडून भाषणात पुन्हा एकदा 15 मिनिटांचा पुर्नउच्चार, छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत केले वक्तव्य ; तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद, अमरावतीत नवनीत राणांचा अकबरुद्दीन ओवैसींना इशारा
💫 ICC कसोटी क्रमवारीत दे धक्का! रोहित शर्मा- विराट कोहली यांना दणका, दोन्ही स्टार आता टॉप 10 पासून दूर ; आयपीएल 2025 च्या लिलावाची तारीख जाहीर, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार लिलाव
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या