🌟रेल्वे उड्डाणपूल लगतची अतिक्रमण न हटवताच केली जात आहे सिमेंट रस्त्यांची निकृष्ट काम🌟
✍🏻विशेष वृत्त :- चौधरी दिनेश (रणजित)
पुर्णा (दि.१३ नोव्हेंबर २०२४) :- पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हिंगोली गेट परिसरात महारेल (एमआयआरडीसी) अंतर्गत मागील सव्वा पाच वर्षांपासून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कासवगतीने सुरू असलेल्या निकृष्ट व दर्जाहीन रेल्वे उड्डाणपूल बांधकामासह आसपासच्या पर्यायी सिमेंट रस्त्यांची कामे बांधकाम गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा ली व महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन ली या कंपन्यांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात असतांना भारतीय रेल्वे प्रशासनातील बांधकाम विभागासह कॉलेटी कंट्रोल विभागाचे अधिकारी संबंधित कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हिंगोली गेट परिसरात महारेल (एमआयआरडीसी) अंतर्गत मागील सव्वा पाच वर्षांपूर्वी दि.२७ ऑगस्ट २०१९ रोजी ९६ कोटी ६६ लाख ३५ हजार ७५७ रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून रेल्वे उड्डाणपूल बांधकामास सुरुवात करण्यात आली होती सदरील रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन करण्यास सुरुवात झाली सदरील रेल्वे उड्डाणपूलाच्या पिल्लरांचे काम दर्जाहीन होत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांशी प्रकाशित करताच नोव्हेंबर २०२१ यावर्षी खडबडून जागे झालेल्या भारतीय रेल्वे प्रशासनातील कॉलेटी कंट्रोल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हिंगोली गेट परिसरातल्या रेल्वे उड्डाणपूलाला प्रत्यक्ष भेट देऊन निकृष्ट दर्जाची जवळपास सात पिल्लर उध्वस्त केली होती यानंतर तर सदरील रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाचा दर्जा सुधारेल अशी अपेक्षा होत असतांना मात्र आज या घटनेला जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटत असतांना देखील कामाचा दर्जा सुधारला नसल्याचे दिसत असून रेल्वे उड्डाणपूल साईट वॉल तसेच स्लॅपसह आसपासच्या पर्यायी सिमेंट रस्त्यांची काम देखील अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन केली जात असून सिमेंट रस्त्यांच्या कामात रस्ता बांधकाम संपल्याचा दर्शनी भागात केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रसारमाध्यमांच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी दिड/दोन फुटांची स्टिल गजाळी टाकून संपूर्ण सिमेंट रस्त्यात मात्र किरकोळ स्वरुपाच्या स्टिल (लोखंडी जाळ्या) टाकून निकृष्ट रस्त्याचे काम करण्याचा सपाटा संबंधित गुत्तेदार कंपन्यांसह या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात अभियंता भुषण गिरी सुरू केल्याने भविष्यात या निकृष्ट व दर्जाहीन कामाचा फार मोठा फटका जनसामान्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय रेल्वे प्रशासनासह महारेल (एमआयआरडीसी) घ्या कॉलेटी कंट्रोल विभागाचे या निकृष्ट व दर्जाहीन रेल्वे उड्डाणपूलासह आसपासच्या सिमेंट रस्त्यांच्या बोगसकामांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे.......
0 टिप्पण्या