🌟परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात इसार संस्थेच्या पुढाकाराने बाल विवाह मुक्त भारत अभियान कार्यक्रम संपन्न....!


🌟या कार्यक्रमात बाल विवाह संदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली🌟


बाल विवाह मुक्त भारत अभियान ऍक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन्स इन्स्टिट्युट ऑफ सोशल अव्हेरणेस अँड रिफॉर्म ( इसार ), यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे, त्या अनुषंगाने श्री शिवाजी महाविद्यालय येथील महाविद्यालयात मुला मुलींमध्ये बाल विवाह बाबतीत जनजागृती व्हावी या प्रमुख उद्देशाने जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमात बाल विवाह संदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. यू. जाधव हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. रवींद्र कटनेश्वरकर अध्यक्ष बाल कल्याण समिती परभणी, दत्ता भुजबळ सदस्य बाल कल्याण समिती परभणी, संदीप बेंडसुरे जिल्हा समन्वयक चाईल्ड हेल्प लाईन परभणी, दिवाकर भोयर संचालक ईसार संस्था यवतमाळ, अनंता सोगे समुपदेशक चाईल्ड हेल्प लाईन परभणी, प्रा. प्रमोद गायकवाड, प्रा. शैलेंद्र पखाले, हंबर्डे, पालोटकर सर, लक्ष्मण गायकवाड जिल्हा समन्वयक, सुलभा ठोके वूमन कोर्डीनेटर, विलास सोनुले फील्ड ऑफिसर, सूर्यमाला ताई मोतीपडे फील्ड ऑफिसर, संजय भिसे हे होते. या वेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. बी. यू. जाधव म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचालींवर आणि वागण्यातील होणाऱ्या बदलांवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे, पालकांनी नित्यनियमाने आपल्या पाल्यांचा मोबाईल तपासावा, वाढत्या घटनांमुळे पालकांना होणार त्रास याचा सुधा विचार मुला मुलींनी केला पाहिजे. इसार संस्थेचे अध्यक्ष दिवाकर भोयर यांनी माहिती दिली की, इसार संस्था परभणी जिल्ह्यातील पन्नास गावांमध्ये जाऊन पालक व मुला मुलींना बाल विवाह रोखण्या संधर्भात जनजागृती करण्याचं काम करत आहेत. या वेळी ॲड. रवींद्र कटनेश्वरकर म्हणाले की, भावनिक संवेदन शिलता त्या सोबतच बुद्धिमत्ता ची जोड असेल तर बाल विवाह रोखण्यास मदत होईल. या वेळी मुलींनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गायकवाड यांनी केलं, सूत्रसंचालन सुलभा ठोके, तर आभार विलास सोनुले यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती लावली होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या