🌟या लढाईत आपल्याला यशच नव्हे..तर उज्वल भविष्य घडवायचे आहे......!


🌟प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे मंगरूळपीर येथील जाहीर सभेत प्रतिपादन🌟


✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम मंगरुळपीर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सिद्धार्थ आकारामजी देवळे यांच्या विजयी संकल्पासाठी इतिहास अभ्यासक आणि प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेला वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, संघटक डॉ सुधीर कव्हर,कॅप्टन प्रशांत सुर्वे, गजानन देशमुख,रामदास मते पाटील,बालाजी वानखेडे, माणिकराव देशमुख,रवी भांदुर्गे,नितीन मडके, आशिष इंगोले,इरफान कुरेशी,रमेश शिंदे, गजानन जैताडे पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                  डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांच्या या प्रचार सभेला जाहीर संबोधित करत असताना प्रा. नितीन बानगुडे पाटील बोलतांना म्हणाले की,या लढाईत आपल्याला फक्त यशच नव्हे,तर उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे.एकत्र येऊ, हातात मशाल घेऊ आणि बदल घडवायचा आहे. गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघांमध्ये एकाच पक्षाची सत्ता होती. मात्र अजूनही या वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाचा विकास झालेला नसल्यामुळे येथील नागरिक हे मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना सामोरे जातात. या मतदारसंघांमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी कुठलेही विकासात्मक कामे केले नसल्यामुळे या मतदारसंघाचा कुठल्याही प्रकारे विकास झाला नाही.तो विकास न झाल्याचा डाग आता जर आपल्याला पुसून काढायचा असेल तर आपण मोठ्या ताकदीने डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना या मतदार संघातून आपण निवडून दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना केले आहे. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघांमध्ये एक उच्चविद्या विभूषित उमेदवार देऊन नक्कीच मतदार संघामध्ये असलेल्या विविध समस्यांची जाणीव असणारा व्यक्तिमत्व आज आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे.म्हणून आपण कुठल्याही अमिषाला बळी न पडता डॉ. सिद्धार्थ देवळे यांनाच या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण त्यांना निवडून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी या जाहीर सभेला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती अक्षरशः या सभेला नागरिकांचा जनसागर  उसळला असल्याचे पहावयास मिळाले....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या