🌟भारतीय संसदेत उत्तर प्रदेशातील संभल येथील मशीद सर्वेक्षणाचे उमटले तिव्र पडसाद....!


🌟हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत राडा ; हिवाळी अधिवेशन दोन दिवसांसाठी करण्यात आले स्थगित🌟

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथील मशीदीच्या सर्वेक्षणाचे संसदेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तिव्र पडसाद उमटले असून संसदेत या प्रकरणी प्रचंड राडा झाल्याने हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन तास संसदेचे कामकाज स्थगित करावे लागले त्यानंतर दोन दिवसासाठी अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय सभापतींनी जाहीर केला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात एका मशीदीचे सर्वेक्षण सुरु असतांना दोन गटामध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन याप्रकरणी सर्वांनी एकसंघ व्हावे असे आवाहन केले होते. अधिवेशनाला सुरुवात होताच पहिल्या एका तासामध्ये संभल मधील मशीद सर्वेक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. या सर्वेक्षण प्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करत उत्तरप्रदेश सरकारची पक्षपाती आणि उतावीळ वृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. असे नमूद करुन संबंधितांचे न ऐकता प्रशासनाने केलेल्या असंवेदनशील आणि असंवेदनशील कृतीमुळे परिस्थिती आणखी बिघडली आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला ज्याला भाजप सरकार थेट जबाबदार आहे. हिंदू- मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी भाजपचा सत्तेचा वापर राज्याच्या किंवा देशाच्या हिताचा नाही. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की, या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून न्याय द्यावा. शांतता आणि परस्पर सौहार्द राखण्याचे माझे आवाहन आहे. जातीयवाद आणि द्वेष न करता भारत एकता आणि संविधानाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राहुल गांधी यांनी या ट्वीटमध्ये केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या