🌟उद्योजक अनिरुद्ध देशमुख यांचे ते वडील तर जेष्ठ पत्रकार डॉ.हरिभाऊ पाटील यांचे ते भावजी होत🌟
पुर्णा (दि.३० नोव्हेंबर २०२४) - पुर्णा येथील अमृत नगर मधील जेष्ठ नागरिक शिवाजीराव धुंडीराज देशमुख राहेरकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी आज शनिवारी दि.३० नोव्हेंबर रोजी पूणे येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आळंदी येथे उद्या रविवार दि.०१ डिसेंबर २०२४ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते उत्तम अभिनेते होते. काही मालीका व टेलीफ्लीम मध्ये त्यांनी चरित्र भूमिका केल्या होत्या.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.अनिरुद्ध देशमुख यांचे ते वडील तर जेष्ठ पत्रकार डॉ. हरिभाऊ पाटील यांचे ते भावजी होत.
0 टिप्पण्या