🌟अपक्ष उमेदवार मोहम्मद गौस झैन यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली रितसर तक्रार दाखल🌟
परभणी :- विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असतांनाच दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी परभणी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मोहम्मद गौस झैन यांच्या विषयी पदार्थांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या दृष्टीने बनावट व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडल्याने अपक्ष उमेदवार मोहम्मद गौस झैन यांनी घटने विरोधात परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे रितसर तक्रार दाखल केली आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मोहम्मद गौस झैन यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की काल सोमवार दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अज्ञात व्यक्तींकडून माझा एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे बनावट व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर चुकीचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. संबंधित खोटा व्हिडिओ तयार करणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर मोहम्मद गौस झैन यांची स्वाक्षरी आहे.....
0 टिप्पण्या