🌟या बैठकीत सहाय्यक निवडणूक निरीक्षक किरण कोल्हे आणि तहसिलदार उमाजी बोथीकर उपस्थित होते🌟
परभणी (दि.06 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांकडून होणार्या निवडणूक खर्चावर भरारी पथके, व्हिडीओ सर्व्हेलेंस टीम यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे या पथकामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी व निः पक्षपातीपणे काम करून आपले कर्तव्य बजावावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक किरण कोल्हे यांनी केले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता भरारी पथक आणि व्ही.एस.टी पथकाचे सर्व अधिकारी व कर्मचार्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ.संदीप राजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सहाय्यक निवडणूक निरीक्षक किरण कोल्हे आणि तहसिलदार उमाजी बोथीकर उपस्थित होते.
निवडणूक खर्चाच्या किंवा मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी रक्कम, मौल्यवान वस्तूंचे वाटप होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ घटनास्थळी पोहचून आवश्यक कार्यवाही करावी, असे सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक किरण कोल्हे यांनी सांगितले. तसेच सभा, रॅली. बैठकांमध्ये वापरलेले साहित्य व परवानगीत परवानगी दिलेल्या साहित्याचे बारकाईने नोंद घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी भरारी व व्ही.एस.टी पथकांना सतर्क राहून निवडणूक खर्चावर कडक नजर ठेवण्यास सांगितले. तसेच त्यांनी सीव्हीजील व ईएसएमएस पवर येणार्या तक्रारीवर जलद गतीने कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. बैठकीत भरारी पथक व व्ही.एस. टी पथकाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते......
0 टिप्पण्या