🌟विशाल कदम धमक्या देणे बंद करा परभणीसह सर्वांना माहीत आहे रत्नाकर गुट्टे काय चीज आहे....!


🌟पुर्णा शहरात आयोजित मेळाव्यात गंगाखेडचे रासपा उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा गंभीर इशारा🌟 


परभणी :- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राजकीय रणांगण आता चांगलेच तापायला सुरुवात झाली असून महाविकास आघाडी उमेदवार विशाल कदम व महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर यांच्यात आता जोरदार शाब्दिक युध्दाला सुरुवात होण्याची चिन्हं दिसू लागली असून काल मंगळवार दि.०५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास पुर्णा शहरातील सुमन मंगल कार्यालयात आयोजित भव्य मेळाव्यात बोलतांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना उद्देशून बोलताना म्हणाले की विशाल कदम धमक्या देणे बंद करा परभणीसह सर्वांना माहीत आहे रत्नाकर गुट्टे काय चीज आहे असा गर्भगळीत इशाराच दिल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली आहे.


पुर्णा शहरात आयोजित मेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत रासप उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे म्हणाले की राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी पुर्णा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला अधिकाऱ्यांनी जाऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी दमदाटी केली होती असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला या संदर्भात बोलतांना डॉ.गुट्टे यांनी व्यासपीठावरुन असा इशारा दिला की विशाल कदम यांनी धमक्या देणे बंद करावे नसता परभणीसह सर्वांना माहीत आहे रत्नाकर गुट्टे काय चीज आहे असे थेट आव्हान त्यांनी विशाल कदम यांना त्यांच्याच कार्यक्षेत्रात येऊन दिल्याने गंगाखेड विधानसभा क्षेत्रातील राजकीय रणांगण तापतांना निदर्शनास येत असून पुढे बोलतांना ते म्हणाले की सन २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विशाल कदम तुम्ही पराभूत झाला त्यानंतर या पाच वर्षात तुम्ही काय विकास कामे केली हे एकदा उघडपणे सांगाच असा सवालही गुट्टे यांनी उपस्थित केला आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा तालुका असलेल्या पुर्णा तालुक्यातील पुर्णा शहरात काल मंगळवारी महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांचा भव्य मेळावा पार पडला या भव्य मेळाव्यात पूर्णा शहरातील शिवसेनेचे शहरप्रमुख पद तब्बल दहा वर्षे यशस्वीपणे सांभाळत शिवसेनेची पाळंमुळं ग्रामीण भागापर्यंत रुजवणारे शिवसेना माजी शहरप्रमुख तथा शिवसेना नगरसेविका विमलताई लक्ष्मणराव कदम पाटील यांचे सुपुत्र नितीन उर्फ बंटी कदम यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी या भव्य मेळाव्यात बोलताना डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आपले प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल कदम यांच्यासह परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ जाधव यांच्यावर सडकून टीका केली.

यावेळी बोलताना डॉ.रत्नाकर गुट्टे म्हणाले की पुर्णा तालुक्याचा मागील पंचवीस वर्षात कधीच विकास झालेला नाही पूर्णा शहर असो की तालुका असो हा आतापर्यंत शिवसेना या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पण ज्यांनी शिवसेनेच्या जीवावर सत्ता भोगली त्यांनी मात्र पूर्णा शहरासह तालुक्यांमध्ये काहीही विकासकामे केली नाहीत त्यामुळे पूर्णा शहरासह संपूर्ण तालुका भकास झाला पण मागच्या अडीच वर्षाच्या काळात मी या क्षेत्राचा आमदार म्हणून पुर्णा तालुक्यामध्ये जवळपास १६०० कोटी रुपयांची विकासकामे करू शकलो असेही ते म्हणाले डॉ.रत्नाकर गुट्टे पुढे बोलतांना म्हणाले की सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुर्णा तालुक्यातून मला केवळ १६ हजार मते पडली होती एवढी कमी मते पडली असली तरी मी सोळाशे कोटी रुपयांचा विकासनिधी या तालुक्यात आणू शकलो. मी कधीच भेदभाव केला नाही, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड-पालम-पुर्णा या तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला

यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी केलेल्या विधानांचा देखील समाचार घेतला. गंगाखेड येथे जाहीर सभेत खासदार संजय जाधव यांनी माझ्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. मी सर्वसामान्यांच्या जमिनी खाल्ल्या असे देखील आरोप केले पण हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत उलट खासदार संजय जाधव यांनी आपल्याच कार्यकर्त्यांच्या जमिनी नावावर करून घेतल्या खासदार संजय जाधव यांना देवस्थानच्या जमिनीही कमी पाडल्या. कारखान्याच्या नावावर कर्ज उचलून शेतकऱ्यांचे सिबिल खराब केले असा गंभीर आरोप करत 'शेतकऱ्यांचे सिबिल कसे मिळवून द्यायचे यासाठी मीच प्रयत्न करत आहे,' असे रत्नाकर गुट्टे म्हणाले.

🌟विरोधी उमेदवार जातीपातीच्या नावावर निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी काहीच नाही - डॉ.रत्नाकर गुट्टे


सध्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम हे जातीपातीच्या नावावर निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी काहीच नसल्यामुळे त्यांच्याकडून जातीचा आधार घेतला जात आहे पण मी मागच्या पाच वर्षांमध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात कधीच जात-पात पाहिली नाही तिन्ही तालुक्यांमध्ये भरघोस असा निधी आणून दिला मराठा समाज असो, मुस्लिम समाज असो की दलित समाज असो या तीनही समाजाचे प्रश्न सोडविण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला आहे त्यामुळे विरोधकांनी आमना सामना करायचा असेल तर समोरासमोर बसून विकासावर चर्चा करावी पाठीमागे जातीपातीच्या नावावर निवडणुकीचा अजेंडा चालवू नये असेही डॉ.रत्नाकर गुट्टे म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या