🌟मुख्यमंत्री आमचाच,पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर ; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ 🌟
✍️ मोहन चौकेकर
💫महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा व मंत्रीमंडळाचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर होणार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित राहणार
💫 काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 1 ताप,असल्याने दिवसभर दरे गावातील घराबाहेर पडले नाहीत, डॉक्टरांकडून तपासणी ; राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून उद्धव ठाकरेंचा टीका ; बाबा आढाव यांचे इव्हिएम विरोधी असलेले उपोषण सुटले
💫शरद पवारांचा बाबा आढावांच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाले, 'निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर या अगोदर कधीच दिसला नाही' ; जनतेचा पाच महिन्यांत कौल बदलला, आम्ही काय करणार ? अजित पवारांचा बाबा आढाव यांना सवाल, प्रलोभनावरही दिलं उत्तर
💫 सत्तास्थापनेआधीच नागपुरातही हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांचा डिजिटल व्यवस्थेत पाहुणचार होणार, 16 ते 24 डिसेंबरदरम्यान होईल नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी साईदरबारी शपथविधीची तारीख सांगितली, नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार
💫 मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ ; गृहमंत्रीपदी डॅशिंग नेता हवा, अर्थखात्याचा कारभारही सक्षम माणसाच्या हातात हवा; शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचें वक्तव्य
💫विधानसभेला मित्रपक्षांनी पाठीत केला वार! स्थानिक स्वराज्य संस्थावेळी मविआ नको, सोलापुरातील ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांची भूमिका ; EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, माळशिरस तालुक्यातील माकरवाडी गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
💫 ईव्हीएम मशीन (EVM) हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर मला सगळं माहितीय ; महादेव जानकर म्हणाले ईव्हीएमविरुद्ध मोठं आंदोलन उभारणार
💫 शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
💫 मध्य प्रदेशात दहशतवाद विरोधी मशाल रॅलीत मोठी दुर्घटना; 30 जण होरपळले, पंधरा गंभीर, 18 आयोजकांवर गुन्हे दाखल ; छत्तीसगडमध्ये संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
💫 पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; मिचेल मार्शलाही दुखापत ; टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
💫 थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
✍️ *मोहन चौकेकर*
0 टिप्पण्या