🌟 परभणीतील सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेना शहरप्रमुख अरुण पवार यांचा परभणी जिल्हा प्रशासनाला खडा सवाल🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा कमालीची सज्ज जिल्ह्यातील प्रत्येक मार्गांवर जागोजाग चेकपोस्ट अधिकारी/कर्मचारी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत असतांनाच देखील संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधीत अवैध गुटखा,अवैध गांजा,अवैध गौण खनिज वाळू तसेच महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग)ची आवक जावक (तस्करी) सह खुलेआम खरेदी विक्री कशी ? असा गंभीर प्रश्न परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेनेचे शहरप्रमुख अरुण पवार यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात संभाजी सेना शहरप्रमुख अरुण पवार यांनी असे म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलिस यंत्रणा राज्यासह परभणी जिल्ह्यात देखील कमालीची सतर्क असल्याचे प्रथमदर्शनी पाहावयास मिळत आहे जिल्ह्यासह सर्व तालुक्यातील शहरी ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांवर चेकपोस्ट देखील सुरू आहेत महत्वाचे म्हणजे पोलिस प्रशासन व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची जागोजाग चेकपोस्टवर दिव्यूटी देखील लावण्यात आली आहे असे असतांना देखील परभणी शहरासह जिल्ह्यात राज्यात बंदी असलेले प्लास्टिक (कॅरी बॅग),राज्यात सर्वत्र प्रतिबंधीत असलेला विषारी गुटखा,अवैध गाजा व गौण खनिज वाळूसह अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहन परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात येतांना दिसत असून प्रशासनाकडून दिखावा करणे अपेक्षित नाही प्रशासनाला संपूर्ण अधिकार असतानाही प्रशासन काही करू शकत नाहीत तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न फक्त सामान्य माणसाच्या माथी मारणे प्रशासनाने बंद करावे असेही संभाजी सेना शहरप्रमुख अरुण पवार यांनी म्हटले असून पुढं बोलतांना ते म्हणाले की प्रशासनाने प्रसार माध्यमांसमोर येऊन जग जाहीर सागांवे की आम्ही प्रशासक/प्रशासन म्हणून हा सर्व प्रकार रोखण्यासाठी असमर्थ होतो व आहेत पुढे बोलतांना त्यांनी असेही म्हटले आहे की गुटखा बंदी कायद्याची अंमलबजावणी यशस्वी पणे करा अन्यथा हा कायदा राबविण्यास महाराष्ट्र प्रशासन असमर्थ आहे म्हणून हा कायदाच रद्द करा........
0 टिप्पण्या