🌟पोलीस अधिक्षक परदेशी यांनी मतमोजणी स्थळास भेट देवून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली🌟
परभणी/पाथरी (दि.२२ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या शनिवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजेपासून येथील शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी आज शुक्रवार दि.२२ नोव्हेंबर रोजी या मतमोजणी स्थळास भेट देवून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकार्यांना व पोलीस कर्मचार्यांना परदेशी यांनी सुरक्षा व्यवस्था संबंधी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील, पाथरी पोलिस निरीक्षक मंडलवार, पोलिस निरीक्षक माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरकर, पोलिस निरीक्षक सांगळे यांची उपस्थिती होती......
0 टिप्पण्या