🌟या प्रकरणात पाच साक्षीदार तपासण्यात आले व न्यायालयाने त्या संबंधीचा निर्णय दिला🌟
परभणी (दि.११ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिस स्थानकाच्या हद्दीतील एका मुलीच्या विनयभंग प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शिवाजी कारभारी शिंदे यास पोक्सो कायदा कलम ८ अन्वये ०३ वर्षाच्या कैदेसह ०५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा तर भादंवि कलम 506 अंतर्गत ०६ महिने कैद,०१ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ०१ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.
मानवत पोलिस स्थानकात ३० मे २०२३ रोजी एक तक्रार दाखल झाली होती त्यातून तक्रारकर्त्याने मुलगी व मुलगा एका किराणा दुकानावरुन सामान घेवून घरी परतत असतांना आरोपी शिवाजी कारभारी शिंदे याने तुझ्या मापाचे कपडे आले आहेत मला तुझे माप घ्यायचे आहे असे म्हणून दुकानात नेले व मुलीचा विनयभंग केला असे नमूद केले मुलगी ओरडली व तीचा भाऊ रडू लागला हे दोघेही तेथून घरी परतल्यानंतर तो प्रकार मुलीने आईस सांगितला असे म्हटले दरम्यान या प्रकरणात मानवत पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला.
जिल्हा मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.अभिलाषा पाचपोर यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला उभा केला. त्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले व न्यायालयाने त्या संबंधीचा निर्णय दिला....
0 टिप्पण्या