🌟सेलूत प्रशस्तीपत्र वितरण सोहळ्यात बोलताना शुभंकरोती फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी असे प्रतिपादन केले🌟
सेलू (दि.१६ नोव्हेंबर २०२४) :- कौशल्य विकासाचे महत्त्व पटल्याने महिला व मुलींच्या शिक्षणात वाढ होत आहे पण महिलांनी फक्त शालेय शिक्षण घेऊन उपयोग होत नाही आपल्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांनी पुढाकार घेऊन व्यवसायाकडे देखील वळावे त्यासाठी महिलांनी व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे असे मत शुभंकरोती फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी व्यक्त केले.
येथील शुभंकरोती फाउंडेशन,देसाई फाउंडेशन,स्कोर एसई इंडिया यांच्यामार्फत चालणार्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशस्तीपत्र वितरण सोहळा या आयोजित कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ललिता गिल्डा,नयना बोर्डीकर व डॉ.रूपाली मालानी तसेच बाबासाहेब मंदिर येथील विश्वस्त मनोज मंडलिक गुरु हे उपस्थित होते शुभंकरोती फाउंडेशन,देसाई फाउंडेशन व स्कोर एसई इंडिया यांच्यामार्फत चालणार्या शिलाई प्रशिक्षण, पार्लर प्रशिक्षण, कॉम्पुटर प्रशिक्षण यामध्ये तीन महिन्याचा मोफत कोर्स करून स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेला वाटचाल करत कुटूंबाला ही आर्थिक हातभार लावत असल्याबद्दल हे प्रमाणपत्र देऊन महिलांना गौरविण्यात आले. महिलांनी व मुलींनी प्रशिक्षण शिबिराचा स्वत:च्या विकासासाठी कसा उपयोग करून घ्यावा, याबाबत माहिती दिली. शुभंकरोती फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी संस्थेच्या विविध आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन संस्थेच्या श्वेता गबाळे यांनी तर आभार निशिकांत पाटील यांनी मानले......
0 टिप्पण्या