🌟गंगाखेड विधानसभेचे वंचित आघाडी उमेदवार घनदाट यांच्या विषयी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी खोटी पोस्ट...!


🌟खोटी पोस्ट व्हायरल करणाऱ्या रासप तालुकाध्यक्षा विरोधात वंचित आघाडी नेत्यांनी केली कायदेशीर कारवाई करण्याची मागणी🌟 

पुर्णा (दि.२० नोव्हेंबर २०२४) गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सिताराम मामा घनदाट यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांना जाहीर पाठिंबा दिल्या संदर्भात खोटी पोस्ट सोशल मिडिया फेसबुक अकाऊंटवर व्हायरल करुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा गंभीर प्रकार समोर आला असून सदरील गंभीर प्रकार राष्ट्रीय समाज पक्षाचे पुर्णा तालुकाध्यक्ष तथा तालुक्यातील मौजे कौडगाव येथील सरपंच जगन्नाथ रेणगडे यांनीच केल्याचे उघड झाल्यामुळे आज बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी संतप्त वंचित बहुजन आघाडीचे नेते दादाराव पंडित,पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे, कामगार नेते अशोक कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी पुर्णा पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली आहे.

पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना यावेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी उमेदवार सिताराम मामा घनदाट यांच्या विषयी सोशल मिडियावर खोटी पोस्ट व्हायरल करणाऱ्या जगन्नाथ रेणगडे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या