🌟विधानसभा निवडणुकीचा काळात सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करावा🌟
परभणी (दि.12 नोव्हेंबर 2024) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असून या काळात कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही तसेच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या निर्देशाचा भंग होणार नाही यासाठी विशेष दक्षता म्हणून व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन व सर्व ग्रुप ओन्ली एडमिन करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
समाज माध्यमांवर व्यक्त होताना अतिशय जबाबदारीने व्यक्त होण्याचा हा काळ आहे. मात्र अनेकजण या काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचार प्रचाराचा भाग होऊन जातात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया मॉनिटरिंग सुरू आहे त्यामुळे याबाबत ॲडमिनने अधिक दक्ष असण्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 पर्यत आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी व निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे या कालावधीत व्हॉटसॲप ग्रुपचे ॲडमीन यांनी ग्रुपच्या सेंटीगमध्ये ओन्ली ॲडमीन बदल करुन घ्यावा, जेणेकरुन ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट करणार नाहीत असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी सोशल मिडीयाद्वारे फेसबुक, इस्टाग्राम, व्हॉटसअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, शवंशाच्या, समाजाच्या,जातीच्या,धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या पोस्ट, कॉमेटस,स्टोरी स्टेटस, डिजीटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करु नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करु नये, डिजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाही, रंग गुलाल उधळणार नाही. संबंधीत विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करु नयेत. व्हॉटसॲप ग्रुपचे ॲडमीन यांनी 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीत त्यांच्या ग्रुपच्या सेटींगमध्ये ओन्ली ॲडमीन करुन बदल करुन घ्यावा. जेणेकरुन ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट् ग्रुपवर टाकणार नाहीत. जर ॲडमीन यांनी सेंटीगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्याला व ॲडमीनला जबाबदार धरुन योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईलयाची नोंद घ्यावी असे आवाहन देखील पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.....
0 टिप्पण्या