🌟 जिल्ह्यात करण्यात आलेल्या धडक कारवायांमध्ये १० कोटी १४ लाखांचा मुद्देमाल जप्त🌟
नांदेड :- नांदेड जिल्ह्यात नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीच्या कालावधीमध्ये नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी कठोर कारवाया करण्यात आल्या यात वाहनांच्या तपासणी दरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आला यात अवैध दारुचे ५३९, गुटखा प्रकरणी २३, अवैध शस्त्र मिळाल्याप्रकरणी आर्म ॲक्ट अंतर्गत २८ गुन्हे दाखल करण्यात आले. यात पिस्टल ५, जिवंत काढतुस ८६ तलवारी खंजर २२,भाले १५ जप्त करण्यात आले. तर नगदी १ कोटी ७४ लाख २७ हजार ४२५ रूपये, वाहने ७२, मोवाईल २ यासह विविध शत्रसाठा जप्त करण्यात आला आहे असे नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सांगीतले. आचारसंहिता काळामध्ये प्रतिबंधक कार्यवाही १ हजार ५३१ ठिकाणी करण्यात आली असून ७८६जणांना जामीन पात्र वारंट तामील केले तर ७६६ जणांना अजामीनपात्र वारंट बजावले आहेत. तपासणी दरम्यान १० कोटी १४ लाख ३५ हजार ७८९ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक बुथवार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून सीआरपीएफ, एसआर पीएफच्या १० कंपन्या बंदोबस्तासाठी नांदेडला दाखल झाल्या आहेत. त्याचवरोवर उपअधीक्षक २ सपोनी २५ पोलिस अधिकारी २०० पोलिस अंमलदार २ हजार ७००, कॅडेट १५१ एनएसएस ४०, निवृत्त कर्मचारी १०० असा बंदोबस्त निवडणुकीसाठी लावण्यात आला आहे.......
0 टिप्पण्या