🌟गंगाखेड विधानसभेचे महाविकास आघाडी उमेदवार विशाल कदम यांच्या गंगाखेड येथील रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद....!


🌟महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांनी शहरातील व्यापाऱ्यांसह मतदारांच्या घेतल्या प्रत्यक्ष भेटीगाठी🌟

गंगाखेड :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांनी आज बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी गंगाखेड शहरातील मुख्य बाजार पेठेत भव्य रॅलीचे आयोजन केले होते यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांनी रॅलीच्या माध्यमातून शहरातील व्यापाऱ्यांसह प्रतिष्ठीत नागरिक तसेच मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्या मशाल या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन देखील केले गंगाखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड.मिथिलेश केंद्रे यांच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला शहरातील पोस्ट ऑफिस लगतच्या हनुमान मंदिराचे दर्शन घेत महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांनी सुरुवात केली. 

गंगाखेड शहरातील सराफा बाजारसह मुख्य बाजार पेठेतून पोलीस स्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत सहभागी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम,गंगाखेड विधानसभेचे माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे,सुनिल चौधरी,प्रमोद मस्के,अन्वर खान,लिंबाजीराव देवकते, शिवसेनेचे ॲड.मनोज काकाणी,ॲड.मिथिलेश केंद्रे,गोपीनाथ लव्हाळे,संजय तिरवड,गोविंद आय्या,जितेश गोरे आदींनी प्रत्येक दुकानावर जाऊन व्यापाऱ्यांची भेट घेत महाविकास आघाडीलाच मतदान करण्याचे आवाहन केले. 

यावेळी भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत क्षितिज चौधरी,मोहसीन खान,गोविंद जाधव,पृथ्वीराज चौधरी,राजेश जाधव, बंडू सौंदळे, अभिषेक चौधरी, सय्यद इस्माईल, अंगदराव बंगाळ, आदनान खान, सुधाकर मुंडे, रजत गायकवाड, शेख ताजोद्दीन, अमोल खटिंग, अॅड. सद्दाम खान, परमेश्वर कदम, सय्यद इस्तियाख, सतिश क्षिरसागर, कुंडलिक भडके आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या