🌟परभणीत मतदान केंद्रावरील बॅलेट युनिटचा फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल करणे आले अंगलट....!

 


🌟शहरातील काद्राबाद प्लॉट येथील शेख सुलेमान यांच्यावर गुन्हा दाखल🌟

परभणी (दि.२० नोव्हेंबर २०२४) : परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरातील शेख सुलेमान या युवकाला मतदान केंद्रावरील मतदान करतांना बॅलेट युनिटचा फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल करणे चांगलेच अंगलट आले असून त्याच्या विरोधात शहरातील नानलपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील शारदा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर आज बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी शेख सुलेमान यांनी मतदान केले स्वतः मतदान करतांना बॅलेट युनिटवरील अनुक्रमांक 14 वरील पिपाणी या निवडणूक निशाणीवर बटण दाबून त्या चिन्हावर मतदान करतेवेळीचा फोटो काढला व तो फोटो स्वतःच्या मोबाईलवरुन फेसबुक अकाऊंटवरुन व्हायरल केला त्याद्वारे मतदानाच्या प्रक्रियेचा व गोपनियतेचा भंग केला.

           या केंद्रावरील अधिकारी तथा जिल्हा परिषद शाखा अभियंता प्रविण देवशेटवार यांनी या संदर्भात नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नानलपेठ पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देवकर हे या प्रकरणात तपास करीत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या