🌟नाशिक येथील मुंबई नाका येथील महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास छगन भुजबळ यांनी केले अभिवादन.....!


🌟यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्याची वेशभूषा साकार करत अभिवादन कार्यक्रमात सहभाग नोंदवला🌟


नाशिक :- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १३४ व्या स्मृती दिनानिमित्त मा. ना. श्री. छगन भुजबळ साहेब यांनी आपल्या नाशिक मधील मुंबई नाका येथील फुले स्मारकात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित राहून फुले दाम्पत्याच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्याची वेशभूषा साकार करत अभिवादन कार्यक्रमात सहभाग नोंदवला. तसेच याप्रसंगी उपस्थितांनी "जय ज्योती,जय क्रांती"चे नारे दिले.

यावेळी आमदार पंकज भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आरपीआय आठवले गट जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एड रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधूने, आनंद सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, गोरख बोडके, समता परिषदेचे प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, समता परीषद जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा कविता कर्डक, माजी नगरसेविका सुनीता निमसे, समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा पूजा आहेर, शहराध्यक्षा आशा भंदुरे, संजय खैरनार, बॉबी काळे, अमोल नाईक, अमर वझरे, किशोरी खैरनार, मीनाक्षी काकळीज, चिन्मय गाढे, जीवन रायते, संदीप बत्तासे, योगेश कमोद, मोहन माळी यांच्यासह विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या