🌟पुर्णा-मिरखेल दरम्यान रेल्वेला धडकून अनोळखी वृध्द इसमाचा दुर्दैवी मृत्यू....!


🌟अनोळखी पुरुष इसमाची ओळख पटल्यास पोलिस स्टेशन पुर्णा येथे कळवावे असे आवाहन पुर्णा पोलिसांनी केले आहे🌟

पुर्णा (दि.११ नोव्हेंबर २०२४) :- पुर्णा ते मिरखेल दरम्यान एका अंदाजे ६० ते ६५ वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वेला धडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार दि‌.११ नोव्हेंबर २०२४ रोजी उघडकीस आली आहे.

 मयत अनोळखी इसमाचे वय अंदाजे ६० ते ६५ असून सदर इसमाच्या अंगामध्ये सुती कापडाची शिवलेली पांढऱ्या रंगाची बनियान,पांढऱ्या रंगाचा खमिस व धोतर अशी वेशभूषा आहे. तसेच सदर इसमाच्या गळ्यामध्ये लिंग असल्याने मयत इसम लिंगायत समाजाचा असण्याची शक्यता आहे फोटो मधील अनोळखी पुरुष इसमाची ओळख पटल्यास पोलिस स्टेशन पुर्णा येथे कळवावे असे आवाहन पुर्णा पोलिसांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या