🌟विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कर्णकर्कश प्रचार तोफांना आज १८ नोव्हेंबर रोजी प्रतिबंध लागणार....!


🌟विधानसभा निवडणूक 'रणसंग्राम' शेवटच्या टप्प्यात : राज्यासह परभणी जिल्ह्यातील प्रस्थापितांना चिंता पुढील भविष्याची🌟

परभणी (वृत्त विशेष) राज्यातील विधानसभा निवडणुक प्रचाराचा आज सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस असून आज सायंकाळी निवडणूक प्रचाराच्या कर्णकर्कश प्रचार तोफांना प्रतिबंध लागणार असून उघडपणे एकमेकांवर होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणे देखील आज बंद होणार आहेत परभणी जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून यात परभणी,पाथरी,जिंतूर,गंगाखेड या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे

परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात मागील सन २०१९ यावर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा पक्षाकडून डॉ.राहूल पाटील,पाथरी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून राज्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुरेशराव वरपुडकर,जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून मेघना बोर्डीकर तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षांकडून डॉ.रत्नाकर गुट्टे बहुमताने निवडून आले होते.मागील २०१९ यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या विद्यमान आमदारांपुढे यावेळी मात्र प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मोठे आव्हान निर्माण केले असून परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा),राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या संयुक्त महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार डॉ.राहुल पाटील तर त्यांचे प्रतिस्पर्धी तुल्यबळ भुमिपुत्र असलेले उमेदवार आनंद भरोसे हे शिवसेना शिंदे,भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टी या तीन पक्षांच्या संयुक्त महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवत असून परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा विरूद्ध शिवसेना शिंदे अशी लढत होणार असून या विधानसभा मतदारसंघात स्थानिक भुमिपुत्र विरूद्ध उपरा असा निवडणूक रंग दिला जात आहे.

जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा),राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या संयुक्त महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार तथा माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टी,भारतीय जनता पार्टी,शिवसेना शिंदे या तीन पक्षांच्या संयुक्त सत्ताधारी महायुतीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार राजेश विटेकर हे विधानसभा निवडणूक लढवत असून पाथरी विधानसभा मतदारसंघात दोघांत तिसरा अन् समद विसरा असं होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीकडून विद्यमान भाजप आमदार मेघनाताई बोर्डीकर तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार विजय भांबळे तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी आमदार कुंडलीकराव नागरे यांचे सुपुत्र सुरेश नागरे असून या मतदारसंघात देखील 'दोघांत तिसरा अन् समद विसरा' अशी परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघ गंगाखेड विधानसभा मतदारसंघ असून हा विधानसभा मतदारसंघ पुर्वी मागासवर्गीयांसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ संघ होता या मतदारसंघातून ज्ञानोबा हरी गायकवाड तीन वेळेस तर विठ्ठल पुरभाजी गायकवाड एक वेळेस तर सिताराम चिमाजी घनदाट हे तीन वेळेस निवडून आले होते या विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार धर्मनिरपेक्ष व सामान्य असला तरी या मतदारसंघात निवडणूक लढवणारे उमेदवार मात्र जनशक्ती विरोधात धनशक्तीला प्राधान्य देणारे धनदांडगे तसेच जातीयवादाला खतपाणी घालणारेच असतात अशी एकंदर ओळख या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण परभणी जिल्ह्यात झाल्याचे निदर्शनास येत आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मागील सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षांकडून निवडणूक लढवलेले विजयी उमेदवार विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे,शिवसेना उबाठा कडून निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले विशाल विजयकुमार कदम व तत्कालीन आमदार सिताराम घनदाट यांच्यात तिरंगी लढत झाली होती या विधानसभा निवडणुकीत देखील तिन्हीं प्रतिस्पर्धी उमेदवार पुन्हा निवडणूक लढवत असून महायुती पुरस्कृत उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाकडून विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे तर महाविकास आघाडीकडून विशाल विजयकुमार कदम व मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राज्याच्या विधानसभेत तब्बल तीन वेळेस प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सिताराम मामा घनदाट यांनी वाजत गाजत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जंगी प्रवेश केला परंतु घनदाट मामांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी माजी आमदार सिताराम घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे तिकीट नाकारत अक्षरशः मामा बनवल्याने शेवटी सिताराम मामा घनदाट यांना संकुचित बुध्दीमत्तेच्या राष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधात बंड पुकारून वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून दंड थोपटत निवडणूक मैदानात उतरावे लागल्याने या गंगाखेड विधानसभा निवडणुकीत देखील तिरंग्या लढतीची चिन्ह दिसू लागली असून गंगाखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी मात्र मागील निवडणुकांप्रमाणे धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी निवडणूक न होता धनशक्ती अधिक जातभक्ती विरूद्ध जनशक्ती असा ऐतिहासिक संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या