🌟 महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे सावध उद्धव ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी🌟

💫 माजी मुख्यमंत्री  व विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे-अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती, 

💫 शिंदेंना राज्य आणि केंद्रात झुकतं माप देणार ; एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या उपस्थितीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामापत्र सोपवलं, 

💫 काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबारी पार पाडणार लवकरच मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या 10, शिंदे गटाच्या 6 तर अजित पवारांच्या 4 आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश होऊन शपथविधी सोहळा पार पडणार 

💫 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत 14/11 च्या शहिदांच्या अभिवादन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी आय कॉन्टॅक्ट टाळला,केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना नमस्कार ; मुख्यमंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये दुराव्याच्या चर्चा ; एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा दीपक केसरकरांनी फेटाळल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका दिपक केसरकरांनी सांगितली 

💫 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे सावध उद्धव ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेतली 

💫 चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मुख्यमंत्रि‍पदाबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट,महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका,तिन्ही पक्षप्रमुख एकत्र बसून ठरवतील, एकनाथ शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नसल्याचं केलं स्पष्ट ; उदयनराजे भोसले यांचं शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदासाठी लॉबिंग,चार आमदारांसह भेटीगाठी सुरु

💫  हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शंका व्यक्त, मविआ नेते इव्हीएमच्या मुद्यावरुन आक्रमक  ; पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा देण्याचे संकेत,वकिलांची टीम तयार करा, शरद पवारांचे आदेश  ; इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली,सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय;जिंकला की इव्हीएम चांगलं, पराभूत झाला की छेडछाड दिसते, याचिकाकर्त्याला  झापले

💫 केंद्रात कॅबिनेट मंत्री करा,आणखी एक मंत्रिपद,राज्यात कॅबिनेट,विधानपरिषद आणि चार महामंडळं द्या ; रामदास आठवलेंकडून मागणीची यादी सादर 

💫 विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव,माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा,सामाजिक चळवळीत सक्रीय राहणार असल्याची माहिती 

💫 केंद्राची पॅन 2.0 प्रोजेक्टला मंजुरी,क्यू आर कोड असलेलं पॅनकार्ड विनामूल्य मिळणार,आयकर विभागाच्या 1435 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी  

💫 खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स;लेखक संजय दुधाणे यांच्याकडून पुणे कोर्टात दावा ; नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार जाहीर,28 नोव्हेंबरला पुण्यात वितरण सोहळा 

💫 बिहारचा वैभव सूर्यवंशी 13 व्या वर्षी करोडपती, लेकाच्या स्वप्नासाठी बापाने खस्ता खाल्ल्या, शेतही विकलं, राजस्थान रॉयल्सनं ज्या वैभवसाठी 1.10 लाख मोजले त्याचा धगधगता संघर्ष

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या