🌟जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रा.गणेश शिंदे यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम घेण्यात आला🌟
परभणी (दि.10 नोव्हेंबर 2024) : परभणी शहरातील जूना पेड़गाव रोडवर असलेल्या जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथील मैदानात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग अंतर्गत स्वीप पथक व जिल्हा होमगार्ड कार्यालय यांच्या वतीने आज रविवार दि.10 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात सर्व होमगार्ड यांनी ‘संकल्प मतदान जनजागृतीचा, वाढवू टक्का मतदानाचा’ या माध्यमातून स्वतः तर मतदान करणार आणि इतर मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प केला.
जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त तालुका समादेशक परमेश्वर जवादे, माजी समादेशक गणेश सामाले, प्रल्हाद ढाले, बालू तनपुरे, गंगाधर कटारे, स्वीप सदस्य त्र्यंबक वडसकर, बबन आव्हाड, महेश शेवाळकर, अतुल सामाले, रामप्रसाद अवचार, सुधाकर गायकवाड, लक्ष्मण गारकर, प्रा. प्रवीण लोणारकर, वैभव पुजारी आदिंची उपस्थिती होती. याप्रसंगी कलावंत प्रफुल्ल शहाणे यांनी ‘करा तुम्ही मतदान जन हो, करा तुम्ही मतदान’, महेश देशमुख यांनी ‘श्रेष्ठ आहे जाणून घ्या रे दानामध्ये दान, ताई-माई-अक्का तुम्ही सार्या करा मतदान’, मोहन आल्हाट यांनी ‘लोकशाहीचा आलाय सण, चला करू मतदान’ तर शिवाजी कांबळे यांनी ‘बूथवर गेल, पाहिजे मतदान केलं पाहिजे’ अशा विविध गीतांवर आणि मृदंग वादक ज्ञानेश्वर पाथरकर यांच्या मृदंगाच्या तालावर उपस्थित होमगार्ड यांनी ठेका धरला. तसेच प्रवीण वायकोस यांनी विनोदी लघु नाटकेतून मतदानाचे महत्त्व पटवून दिले. प्रास्ताविकातून अरविंद शहाणे यांनी मतदान जनजागृतीतून मतदानाचा टक्का वाढावा असा स्वीपचा उद्देश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप हनुमंत हंबिर यांनी उपस्थित होमगार्ड यांना मतदानाची शपथ देऊन केला. सूत्रसंचालन संजय पेडगांवकर तर आभार तालुका समादेशक परमेश्वर जवादे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी पडोळे, आनंद गाडगे, धनाजी कुलकर्णी, सुनील आहेरे, ज्ञानोबा लटपटे, माणिक ढाले, पाचपोर, गणेश खुने, श्रीमती डि. एम. वाकळे, श्रीमती आर. एम. बोचरे, वृंदामित्रा डिब्बे आदिसह सर्व होमगार्ड अधिकारी, कर्मचारी, स्वीप सदस्य यांनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या