🌟भारतीय शेतीच्या अधोगतीस सरकारी धोरणेच जबाबदार - जगदीश जोगदंड


🌟'भारतीय शेती समोरील आव्हाने व उपाय' या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते🌟


----------------------------------- 

पुर्णा (दि.३० नोव्हेंबर २०२४) :- आजच्या वर्तमानात भारतीय शेतीच्या अधोगतीस सरकारी धोरणे आणि निसर्गाची अवकृपा जबाबदार असल्याचे प्रतिपादन पत्रकार जगदीश जोगदंड यांनी केले. ते येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या कै.के.एम.देशमुख व्याख्यानमालेत 'भारतीय शेती समोरील आव्हाने व उपाय' या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.


पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय शेतीची परंपरा आणि आजच्या शेतीची अवस्था पाहता  आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती व्यवसाय कसा सक्षम होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. तरच उद्याचा ग्रामीण भागातील शेती व्यवसाय व गावगाडा सुरक्षित राहील असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. सुरेखा भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,आजच्या तरुण वर्गाने सेंद्रिय शेतीचे आणि व्यावसायिक शेतीचे ज्ञान अवगत करून स्त्री पुरुष समानतेने शेती व्यवसाय समृद्ध केला पाहिजे तरच ग्रामीण भागातील शेती आणि शेतकरी प्रगतीच्या वाटा चालेल असा विचार त्यांनी यावेळी मांडला. याप्रसंगी विचार मंचावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. भीमराव मानकरे, सिनेट सदस्य डॉ. विजय भोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 या व्याख्यानमालेचे संयोजक तथा विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी आपल्या प्रस्ताविकात व्याख्यानमालेचे महत्त्व आणि उद्देश स्पष्ट करून सांगितला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शारदा बंडे यांनी केले तर आभार डॉ .प्रभाकर कीर्तनकार यांनी मांडले. याप्रसंगी व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील प्रा.डॉ. संजय कसाब,प्रा.डॉ. प्रभाकर किर्तनकार, प्रा. डॉ.दिपमाला पाटोदे आदी प्राध्यापक ,कर्मचारी, विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या