🌟महाविकास आघाडी उमेदवार विशाल कदम यांचा महायुतीच्या डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केला २७ हजार ४६१ मतांनी पराभव🌟
परभणी (दि.२३ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचा तब्बल २७ हजार ४६१ मतांनी पराभव करीत दुसर्यांना विधानसभा गाठली.
लोकसभा निवडणूकीत गुट्टे यांनी महायुतीस मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीतसुध्दा ते प्रभाव सिध्द करतील असे अपेक्षित होते परंतु शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी या निवडणूका प्रतिष्ठेच्या केल्या गुट्टे यांच्या विरोधात मोठे रान उठवले गेले परंतु खा.संजय जाधव यांचे सर्वच प्रयत्न डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी निष्फळ ठरवले.....
0 टिप्पण्या