🌟दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या आडमुठेपणाचा शेतकऱ्यांसह पुर्णा तालुक्यालाही बसणार जबरदस्त फटका🌟
🌟गौर आडगाव लासीना बरबडीतील शेतकऱ्यांच्या जमीनींचे जबरदस्तीने मोजमाप जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध🌟
✍🏻विशेष वृत्त :- चौधरी दिनेश रणजित
दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणारे पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानक निजाम/इंग्रज राजवटी पासुनच भौगोलिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाते परंतु परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेसह शेजारील नांदेड जिल्ह्यातील संधीसाधू लोकप्रतिनिधींचे पळवापळवीचे धोरण आणि दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील भाषा/प्रांतवाद्यांची कपटनिती यामुळे कोट्यावधी रुपयांच्या जमीन संपत्तीसह शेकडो निवासस्थान असंख्य सुसज्ज कार्यालय मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था असतांना देखील रेल्वे प्रशासनाने सुडबुध्दीने पुर्णा जंक्शनच्या हक्काचे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयासह पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील अनेक महत्त्वाच्या कार्यालयांची नांदेडला पळवापळवी केली परंतु पुर्णेकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की अशा पध्दतीने पुर्णा जंक्शनचा सोईस्कर रित्या काटा काढला जात असतांना मात्र परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधी तथाकथित समाजसेवकांसह संधीसाधू व्यापारी संघटनांनी विरोध करणे तर सोडाच या सर्व प्रकारा विरोधात चकार शब्द देखील काढला नाही त्यामुळे कधीकाळी संपूर्ण मराठवाड्यात सर्वात महत्त्वाचे आणि सुखसुविधायुक्त जंक्शन असलेल्या पुर्णा जंक्शनसह परभणी जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुर्णा तालुक्याला देखील अक्षरशः वाळवी लागल्यागत परिस्थिती होऊन या पुर्णा तालुक्याला साडेसाती लागण्यास सुरुवात झाली.
नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील पुर्णा जंक्शन द्वेष्ट्या भाषा/प्रातवाद्यांसह नांदेड जिल्ह्यातील संधीसाधू पुढाऱ्यांनी आणखी एक कुटील डाव खेळत नांदेड जिल्ह्यातील चुडावा व हिंगोली जिल्ह्यातील मरसूळ येथून चुडावा-मरसूळ बायपास लोहमार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळवून पुर्णा रेल्वे जंक्शनला संपूर्णतः भकास करण्याचा कट रचला या कुटील कटात पुर्णा तालुक्यातील मौ.गौर/आडगाव लासीना/बरबडी या गावांतील १०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असलेल्या शेतजमीनींवर दांगदपट करीत कुर्राड चालवण्यालाही नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकारी व पुर्णा तालुका भुमी अभिलेख कार्यालयाने सुरुवात केली.
नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकारी व उप अधिक्षक भुमी अभिलेख पुर्णा यांनी पुर्णा तालुक्यातील मौ.गौर/आडगाव लासीना/बरबडी या गावांतील १०२ शेतकऱ्यांना भुसंपादन मोजनी अर्ज क्रमांक :- सिएएन-अतितातडी-७७०५५ जा.क्र.३०४१ अंतर्गत दि.०४ आक्टोंबर २०२४ रोजी भुसंपादन नोटीस जारी करून गौर शिवारातील शेतकऱ्यांना दि.१४ आक्टोंबर २०२४ तर बरबडी शिवारातील शेतकऱ्यांना दि.१८ आक्टोंबर २०२४ रोजी जमीन अधिग्रहणाच्या मोजणीस येणार असल्याची नोटीस जारी करण्यात आली होती या जमीन अधिग्रहण मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित गावातील शेतकऱ्यांनी या शेतजमिनीवर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने आम्ही जमीनी नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाला चुडावा-मरसूळ बायपास लोहमार्गासाठी दिल्यास आमच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासह भविष्याचे काय ? असा न्यायिक प्रश्न उपस्थित करीत विरोध केला यावेळी नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील आडमुठ्या अधिकाऱ्यांसह उप अधिक्षक भुमी अभिलेख पुर्णा येथील मोजणी अधिकारी गोविंद कोल्हेवाड यांनी संबंधित शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून यातून योग्य मार्ग काढण्यासह शेतकऱ्यांना दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून योग्य मोबदला देण्यासाठी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने पर्याय शोधला जाईल असे समजावण्याऐवजी गौर शेत शिवारातील शेतकऱ्यांना धमकावून शेतजमीन अधिग्रहण करण्याच्या दृष्टीने मोजमाप केल्याने शेतकरी संतप्त झाल्याने संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन एकीकडे चुडावा-मरसूळ बायपास लोहमार्गासाठी पुर्णा तालुक्यातील मौ.गौर/आडगाव लासीना/बरबडी या गावांतील १०२ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जबरदस्तीने फुकटभाव घेऊन त्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे महापाप तर करीतच आहे त्याहीपेक्षा घोर पाप या चुडावा-मरसूळ बायपास लोहमार्गाला पुर्णेत थांबा न देऊन पुर्णा तालुक्यावर देखील नेहमीप्रमाणे अघोरी सुड उगवत असतांना परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातील देखील अकार्यक्षम लोकप्रतिनिधी संधीसाधू व्यापारी तथाकथित समाजसेवी अंधत्वाचे सोंग घेऊन धृतराष्ट्राची भुमिका आठवतांना पाहावयास मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.....
टिप : कृपया सदरील विशेष वृत्ताची कॉफी करण्याचा लाजीरवाणा प्रकार करू नयें....
0 टिप्पण्या