🌟पुर्णा शहरातील श्री गुरु बुध्दीस्वामी मठ संस्थान येथे दासोह शिष्यवृत्ती व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न.....!


🌟यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर महाजन,सिताराम कापुसकरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती🌟


पुर्णा (दि.०४ नोव्हेंबर २०२४) :- पुर्णा शहरातील श्री गुरु बुध्दीस्वामी मठ संस्थानात प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी आज सोमवार दि.०४ नोव्हेंबर रोजी लिंगायत समाजातर्फे दासोह शिष्यवर्ती आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर महाजन,सिताराम कापुसकरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती 

दरम्यान याप्रसंगी श्रद्धा नगरसले या विद्यार्थिनीला एन आय टी नागपूर येथे प्रवेश भेटल्यामुळे समाज बंधवांतर्फे 25000रू रोख शिष्यवृत्ती देउन सन्मान करण्यात आला तसेच समाजातील 10 वी आणि 12, वी मधील गुणवंत विद्याथ्र्यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला ह्यावेळी समाजातील प्रतिष्ठित बांधव, प्राध्यापक, वकील, शिक्षक यांसह सर्व समाजबांधव, महिला पत्रकार, विदयार्थी यांची मोठी उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या