🌟तालुक्यातील ग्रामीण गावात 'शिवशासन ग्रुप' आयोजित प्रत्यक्ष मतदार भेटीगाठी कॉर्नर सभांना मिळतोय प्रचंड प्रतिसाद🌟
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार यांच्या प्रचारार्थ 'शिवशासन ग्रुपचे' चे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ सोलव यांनी पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील गौर,ममदापूर,हिवरा वाई,सुहागन,पांगरा ढोणे,आडगाव सुगाव,पिंपळा लोखंडे,धार,मरसुल,कानेगाव,फुकटगाव,पांढरी,रेगाव,धोतरा या गावांत झंझावाती प्रचार यंत्रणा राबण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येत असून त्यांच्या या मतदार जनसंपर्क अभियानास विविध गावांतील कॉर्नर सभांना 'न भुतो न भविष्यती' असा प्रतिसाद मिळत असून आपल्या शेंकडों समर्थक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ते ग्रामीण भागात महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे हात बळकट करीत असल्याचे पाहावयास मिळत असून त्यांच्या या वादळी प्रचार यंत्रणेमुळे विरोधकांना अक्षरशः धडकी भरल्याचे दिसत आहे.........
0 टिप्पण्या