🌟पुर्णा तालुक्यातील सुरवाडीत धाडसी घरफोडी चोरट्यांनी पळवले ५ लाख ९५ हजार ९२५ रुपयांचे सोन्याचे दागिने...!


🌟सुरवाडीत झालेल्या जबरी घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे🌟

पुर्णा (दि.११ नोव्हेंबर २०२४) :- पुर्णा तालुक्यातील सुरवाडी येथील ग्रामस्थ तातेराव पाचकोर यांचे घरफोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९५ हजार ९२५ रुपयांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना दि.०९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळच्या सुमारास घडली असून या घटने संदर्भात तातेराव पाचकोर यांनी पुर्णा पोलिस स्थानकात रितसर तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटने संदर्भात फिर्यादी पाचकोर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की आपल्या घरी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडत सोन्याच्या १० नग लक्ष्मीच्या पुतळ्या,कानातील झुंबर,सोन्याच्या अंगठ्यांसह ०४ लाख रूपयें नगदी रक्कम असा एकूण ०५ लाख ९५ हजार ९२५ रुपयाचा मुद्देमाल लंपास केला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पुर्णा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे हे करत असून पुर्णा तालुक्यात अज्ञात चोरट्यांची अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे दिसत असून सुरवाडीत झालेल्या जबरी घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या