🌟परभणी येथे उद्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सामूहीक हनुमान चालीसा पाठाचे आयोजन....!


🌟कारेगाव रस्त्यावरील वृंदावन कॉलनी येथील संकटमोचन हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा ११ पाठाचे आयोजन🌟 

 परभणी (दि.३० नोव्हेंबर २०२४) : परभणी येथील कारेगाव रस्त्यावरील वृंदावन कॉलनी येथील संकटमोचन हनुमान मंदिरात कार्तिक महीना दर्श आमवस्या निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शनिवार ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०७.३० वाजता सामूहिक हनुमान चालीसा ११ पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.

            श्री  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणीच्या वतीने मागील ०२ वर्षापासुन महिन्याच्या प्रत्येक आमवस्येला शहरातील विविध भागात हनुमान चालीसा ११ पाठाचे आयोजन करण्यात येते. शनिवार वृंदावन कॉलनी नगरातील संकट मोचन हनुमान मंदिरात आयोजित या हनुमान चालीसा पाठासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या